आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमुदा अार्यन शुगर्सच्या भोसलेंसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी | सोलापूर - ऊस बिलाची थकीत रक्कम दिल्याप्रकरणी कुमदा-आर्यन साखर कारखान्याचे प्रमुख डॉ. अविनाश भोसले (रा. कोल्हापूर) यांच्यासह संचालकांविरुद्ध सोमवारी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पांगरी येथील शेतकरी अमोल जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

कुमदा-आर्यन शुगर्सने शेतकऱ्यांचे ५२ लाख ५४ हजार ४९२ रुपये ऊस बिलापोटी रक्कम थकीत ठेवले आहेत. यासंदर्भात आंदोलन छेडूनही संबंधित पदाधिकारी प्रतिसाद देत नव्हते. शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तहसीलसमोर आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेतल्याने साखर आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्याची भूमिका संघटनेने घेतली होती. त्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर मुंबईत तातडीची बैठक घेतली. पाटील यांनी तथ्य तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले होते. त्यानंतर सोमवारी अमोल जाधव यांनी फिर्याद दिली.

ऊस गाळपाला दिला, पण पूर्ण पैसे दिले नाहीत
अमोलजाधव यांनी कारखान्याचे शेअर घेऊन जानेवारी २०१५ मध्ये शेतजमीन गट नं १००१ कारी येथील ऊस कारखान्यास कारखाना प्रतिनिधी सुभाष बदाले (रा. नारी) यांच्यामार्फत वाहनातून ( एम. एच. १३ एजे ६०८९) ८० टन पाठवला. त्यापैकी केवळ १३ टन उसाची पाेचपावती मिळाली. कारखान्याचे अधिकारी नलावडे यांनी थोड्या दिवसात खात्यावर पैसे भरण्याचे आश्वासन दिले. परंतु कोणतीही रक्कम मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याची फिर्याद जाधव यांनी दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...