आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळगावच्या लाचखाेर पीएसअायवर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा - पिंपळगाव हरेश्वर येथील पाेलिस उपनिरीक्षक नाना दाैलत अहिरे यांना अाठ हजार रुपयांची लाच घेताना साेमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पिंपळगाव हरेश्वर पाेलिस ठाण्यामध्ये न्यायालयाच्या अादेशान्वये सीअारपीसी १५३ (३)प्रमाणे गुन्हा दाखल झाला हाेता. या प्रकरणाचा तपास पाेलिस उपनिरीक्षक नाना अहिरे करत हाेते. मात्र, त्यात तक्रारदार त्यांच्या मित्रांना या गुन्ह्यात अटक करता परस्पर न्यायालयात हजर करण्यासाठी गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी प्रत्येकी दाेन हजारांप्रमाणे पाच जणांचे १० हजार रुपये मािगतले. तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार साेमवारी पाचाेऱ्यात सापळा रचण्यात अाला. अाठ हजारांची लाच घेताना पकडण्यात अाले.

बालसंरक्षण अधिकाऱ्याला अटक
धुळे अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यास परवानगी देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील जि ल्हा बालसंरक्षण अधिकारी अाम्रपाली माेरे यांना अटक केली अाहे. तक्रारदाराच्या चुलत भावाचा विवाह २८ फेब्रुवारी २०१६ राेजी हाेणार हाेता. अाम्रपाली माेरे यांनी वधू अल्पवयीन असल्याचे सांगून हा विवाह राेखण्याबाबत नाेटीस बजावली हाेती. त्यानंतर विवाह लावू देण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली.