आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Against Corporator Pudale Along With Tenth

नगरसेवक पुदालेसह दहा जणांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिसात दाखल असलेले प्रकरण मागे घे म्हणून दमदाटी करून डोक्यात गुप्तीने वार केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक अमर पुदाले यांच्यासह दहा जणांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गणेश पेठ येथील मदनलाल सायकल दुकानाजवळ हा प्रकार घडला.

या प्रकरणी श्रीशैल मलय्या मठपती (वय ३७, रा. साखर पेठ) यांनी मंगळवारी फिर्याद दिली आहे. भाजपा नगरसेवक अमर पुदाले जमाव घेऊन आले आमच्या िवरुद्धची केस काढून घे नाहीतर तुला साथीदारांना खल्लास करतो' असे दमदाटी करून हातातील गुप्तीने श्रीशैल मठपती यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच हात पकडून लाथाबुक्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी श्रीशैल मठपती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजप नगरसेवक अमर पुदाले, राकेश रमेश गदगे, रतन खैरमोडे, औदंबर शेवाळे, सचीन शेवाळे, गणेश चव्हाण यांच्यासह पाच लोकांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.