आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेसी प्रकरणी मंत्री गडकरीसाेबत होईल बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - परिवहन विभागातील ८७ बसच्या चेसी क्रॅक झाल्याने त्या बस दुरुस्त होणे शक्य नाही. त्यामुळे मनपा कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सिटीबस चेसी क्रॅक प्रकरणी पालकमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, परिवहन सभापती राजन जाधव, नगरसेवक अशोक निंबर्गी, शिवानंद पाटील, परिवहन सदस्य शंकर बंडगर, शांभय्या वडलाकोंडा आदी उपस्थित होते.

सिटीबस चेसी क्रॅक प्रकरणी अशोक लेलँड कंपनीस महापालिकेने नोटीस दिली आहे. मात्र कंपनीने अद्याप उत्तर दिलेले नाही. केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम योजनेतून बस आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार पालकमंत्री विजयकुमार देशमुख केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी बोलून बैठक घेण्याचे ठरले, अशी माहिती मनपा विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी दिली.

कंपनीकडे बस बदलून देण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यात येणार आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, केंद्र मध्यस्थी करून तोडगा काढल्यास हे प्रकरण लवकर मार्गी निघू शकेल, असे सभापती जाधव यांनी सांगितले. परिवहनच्या सुधारणे संदर्भात व्यवस्थापक म्याकलवार यांना १५ पत्रे दिल्याचेही ते म्हणाले.
उजनीतील पाणी हिप्परगा तलावात आणण्याचे प्रयत्न
बैठकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख करणार मध्यस्थी, मनपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा
सोलापूर पावसाळ्यातउजनीचे पाणी हिप्परगा तलावात आणण्यासाठी महापालिका आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख प्रयत्नशील आहेत. त्याकरिता शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. महापालिकेने कारंबाजवळ पंपिंग करून पाणी पुढे न्यावे. त्यासाठी येणारे वीज बिल भरण्याची तयारी असल्याचे पत्र द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री देशमुख यांच्या समवेत मनपा पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. उजनी ते सोलापूर जलवाहिनी घालण्यासाठी एनटीपीसी महापालिकेस २५० कोटी रुपये देणार आहे. यातून जलवाहिनीबाबत विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी ठरले.
बातम्या आणखी आहेत...