आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chendrakant Patil Commentesd On Cooperative Issue In Solapur

सहकार टिकवन्यासाठी भ्रष्टाचार संपवणे आवश्यक, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सहकारात ५४ प्रकारच्या संस्था आहेत. त्यात सहा कोटी कामगारांची उपजीविका चालते. त्यामुळे हे क्षेत्र टिकवावे लागेल. त्यासाठी त्यातील भ्रष्टाचार संपवावा लागेल, असे परखड मत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे मांडले. राज्यभरातील लाख पिशवीतल्या संस्था निकाली काढल्या. आता काही संस्थांची चौकशी सुरू आहे. त्यात भ्रष्टाचार आढळला तर दोषींची गय नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अनेक सहकारी बॅँकांमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. त्यात २० बड्या नेत्यांचा सहभाग दिसून येतो. त्यांना गजाआड करण्यात येईल. दोषी संचालकांना १० वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे नवे धोरण अमलात आणले आहे. या धोरणात अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्यांनाही सोडण्यात येणार नाही, असे सूतोवाच श्री. पाटील यांनी केले. राज्य सहकारी बॅँक कर्मचारी महासंघ आणि भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने रविवारी कन्ना चौकातील तोगटवीर मंगल कार्यालयात चौथे त्रैवार्षिक अधिवेशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. संघटनेच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी कामाची व्याप्ती वाढवण्याचा सल्ला संघटनेच्या नेत्यांना दिला.

दलित, मुस्लिमांच्या उद्योगधंद्यांना कर्जे द्या
बँकांतकर्ज प्रकरणांचा विचार करताना सामान्यांची नेहमीच अडवणूक होते. ही बाब काही चांगली नाही. ज्याची पत पाहिली जाते, त्याला खरे पाहता, गरजच नसते. परंतु ‘सुरक्षित कर्जे’ या नावाखाली त्याच त्या उद्योगांना, त्याच त्या व्यक्तींना कर्जे देण्यात येतात. त्यामुळे बँकांचा कार्यभाग उरकतो. परंतु त्यातून सामान्यांचे कल्याण होते का? दलित, मुस्लिम उद्योगांचाही विचार करावा. त्यांच्या नव्या प्रकल्पांना संधी द्यावी. तरच सहकाराला खरा अर्थ प्राप्त होईल, असे श्री. पाटील म्हणाले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री देशमुख, अॅड. कुलकर्णी, देशपांडे. यांची उपस्थिती
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, सोलापूरचे सचिव अॅड. अजित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जयंतराव देशपांडे, किशोर मोगल, रवींद्र सहस्रबद्धे आदी उपस्थित होते. दीनदयाळ गुंड यांनी सूत्रसंचालन केले. मोगल यांनी आभार मानले.