आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी खरेदीसाठी जाताना डंपरने उडवले, चिमुकल्याने आईसमोर सोडला प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिवाळीसाठी माहेरी अाल्यानंतर तीन वर्षीय मुलाला घेऊन खरेदीसाठी निघालेल्या बहिणीच्या दुचाकीला रंगभवन चौकात डंपरने उडवले. यात तीन वर्षीय मुलाने अाईसमोरच प्राण सोडला. हे दृश्य पाहून अनेकांचे मन हेलावले. ही घटना सोमवारी दुपारी च्या सुमाराला घडली.
अपूर्व अनिल काटकर (वय ३, रा. तुळजापूर, हल्ली सिंधुदुर्ग) असे मृत मुलाचे नाव आहे. पूनम काटकर (वय २६) पल्लवी दगडू गवळी (वय २४, रा. मोदीखाना, सोलापूर) दोघी जखमी अाहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दोघींच्या पायाला गंभीर दुखापत अाहे. अपघातानंतर चालक पळून गेला. पूनम यांचे पती अनिल हे शिक्षक अाहेत. त्यांचे सासर तुळजापूर अाहे. पतीच्या नोकरीसाठी सिंधुदुर्ग येथे राहतात. दिवाळी सुटी असल्यामुळे त्या माहेरी मोदीखान्यातील दगडू गवळी यांच्याकडे अाल्या होत्या. बहीण पल्लवीसोबत मुलाला घेऊन दिवाळी बाजारासाठी स्कूटीवरून (एमएम १३ डीअार ७२६६) नवीपेठेत जात होत्या. यादरम्यान खडीने भरलेलाडंपर (एमएच १७ एजी ४०७६) रंगभवन चौकातून सिव्हिल चौकाकडे जात होता. रंगभवन चौकात कोपऱ्यावर अाल्यानंतर डंपरने स्कूटीला धडक दिली. पूनम या मुलाला घेऊन पाठीमागे बसल्या होत्या. मुलगा चाकाखाली उडून पडल्यामुळे चिरडला. पूनम पल्लवीच्या पायावरून चाक गेल्यामुळे दोघीजणी गंभीर जखमी झाल्या. अपघात इतका भीषण होता की, काही अंतर सर्वांना फरफटत नेले. रस्ता रक्ताने माखला होता. अपघातानंतर चालक पळून गेला. नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या. उपचाराला तिघांना शासकीय रुग्णालयात अाणल्यानंतर मुलगा मरण पावल्याचे सांगण्यात अाले. दोघींना खासगी रुग्णालयात हलवण्यात अाले. पल्लवी दगडू गवळी यांनी जेल रोड पोलिसांत तक्रार दिली अाहे. चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती जेल रोडचे पोलिस निरीक्षक फारुक काझी यांनी दिली.
पंधरवड्यात चौघांचा मृत्यू
या पंधरवड्यात चौघांचा मृत्यू झाला. सैफुल चौकात डंपरच्या धडकेत कटिंग दुकानदाराचा मृत्यू झाला. वालचंद काॅलेजवजळ खासगी बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रविवारी पसारेवस्तीजवळ ट्रकच्या धडकेत तरुण चित्रकार मरण पावला. अाज पुन्हा चौथा बळी गेला.

शहरातील जड वाहतूक बंद करा...
शहरातील जड वाहतुकीमुळे अनेक विद्यार्थी नागरिकांचे जीव जात आहेत. यामुळे आता शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे केली आहे. शहरातून जड वाहतूक काही वेळ सुरू करण्यात आली आहे. मात्र गेल्या चार दिवसांत शहरामध्ये जड वाहतुकीमुळे दुसरा बळी गेला आहे. जड वाहतुकीमुळे शहरवासीयांचे जीव जात आहेत. यामुळे प्रशासनाने शहरातील वाहतूक बाह्यमार्गाने सुरू करावी.

पुलालादुचाकी धडकून दोन ठार
सोलापूरमार्गावर सांगवी मार्डी शिवारात भरधाव दुचाकी पुलाला धडकून झालेल्या अपघातात जण ठार झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. सोलापूर येथील दोघे दुचाकीवरून (एमएच १३ -सीइ-१७९६) तुळजाभवानीचे दर्शन करून सोलापूरकडे परतत होते. त्यांची दुचाकी सांगवीमार्डी शिवारात काम सुरू असलेल्या पुलाच्या बॅरिकेडिंगला धडकली. यामध्ये रामचंद्र भैरवनाथ गायकवाड समुवेल अरुण गवळी (दोघे रा. सोलापूर) हे पुलावरून खड्ड्यात पडून ठार झाले. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डंपर अालाच कसा?
शहरातसकाळी साडेसहा ते दीड सायंकाळी साडेतीन ते सात या वेळेत अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही ही वाहने शहरात येतातच कशी? पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत. अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय वाहनांना मुभा अाहे. पण, शासकीय काम कुठले अाहे. साइटचे नाव काय, महपालिका अथवा महसूल विभागाची परवानगी अाहे का? असल्यास त्याची माहिती काचेवर लिहिणे सक्तीचे अाहे. हा नियम कुणी पाळत नाही. दुसरीकडे नागरिकांचा जीव जातोय.
बातम्या आणखी आहेत...