आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या चिमुकल्याचा विहिरीत पडुन मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा (सोलापुर)- दिवाळी सणासाठी मामाच्या गावाला आलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडुन मृत्यु झाला. ही घटना माढा तालुक्यातील अजंनगाव (खेलोबा) येथे सकाळी 7 च्या सुमारास घडली. सुमित सिध्दराम तरटे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील हिवरे येथे तो चौथी इयत्तेत शिकत होता. सुट्टीसाठी तो मामा दशरथ अंकुश गडेकर यांच्याकडे शुक्रवारी (20 ऑक्टोबर) आला होता. 
 
शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास तो अजंनगाव येथील मामाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत सत्यजीत तरटे या मावस भावांबरोबर गेला होता. सत्यजितला पोहता येत होते. तर सुमितला पोहता येत नव्हते. सत्यजित कसा पोहतो हे पाहण्यासाठी सुमित विहिरीवर गेला होता.
सत्यजित विहिरीत उतरायच्या अगोदर सुमित हा या विहिरीच्या मातीच्या पायऱ्यांवर बसुन विहीरीत डोकावत बसला होता. सत्यजित विहिरीत उडी मारणार इतक्यात सुमितचा मातीच्या पायऱ्यांवरुन तोल जाऊन घसरुन विहिरीत कोसळला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात  बुडाला. सत्यजितने घराकडे जाऊन सुमित विहिरीत पडल्याची कुटूंबिंयाना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियानी व ग्रामस्थांनी विहिरीवर मोठी गर्दी केली होती. या मुलाचे शवविच्छेदन माढा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी कुटूंबिंयानी हंबरडा फोडला. माढा पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोस यानी भेट दिली.
 
मृतदेह बाहेर काढण्यास लागले 5 तास 
सुमित पडलेल्या विहिरीत 50 फुट एवढे पाणी होते. सकाळी सात वाजता पडलेल्या सुमितला बाहेर काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. या विहिरीतील पाणी काढण्यासाठी 
10 विद्युत मोटारी टाकण्यात आल्या होत्या. तरी ही पाणी संपत नसल्याने अग्निशमन दल सोलापुर येथून आले. त्यांनाही पाण्यात हुक टाकुन मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. पाणी अधिक उपसा केल्यानंतर अंजनगाव मधील तरुणांनी विहिरीत उडी टाकुन मृतदेह शोधुन विहिरी बाहेर काढला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...