आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकामगारमुक्त मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आज सोलापुरात, तिघेही ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाचे कलावंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘एलिझाबेथएकादशी’ या मराठी चित्रपटात मुक्ताची भूमिका केलेली सायली भंडारकवठेकर, गणूच्या भूमिकेतला पुष्कर लोणारकर आणि दुर्गेश बडवे हे बालकलावंत रविवारी सोलापूरकरांच्या भेटीस येत आहेत. बालकामगारमुक्त सोलापूरचे ते ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. जागतिक बालमजुरी प्रथाविरोधी दिनानिमित्त ही बालमंडळी सोलापूरला येत आहेत. सकाळी साडेआठला निघणाऱ्या जनजागृती फेरीत ते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाने तिन्ही कलावंतांना निमंत्रित केले आहे. काही अनुभव कथन करत बालकामगारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यांच्या चित्रपटाचे ऑडिशन कसे झाले? एडिटिंग काय असते? शूटिंगच्या वेळी झालेल्या गमती-जमती आदी सांगणार आहेत. या शिवाय नकलांचा कार्यक्रम करून बालकामगारांचे मनोरंजनही करणार आहेत. बालकामगारांशी संवाद साधताना ही कलावंत मंडळी काही टिप्सही देणार आहेत. जसे- शिक्षकांचा आदर करावा, अपयश आले तर निराश होता, पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत.
दुर्गेश बडवे

जनजागृती सप्ताह
सकाळी साडेआठला चार हुतात्मा पुतळा येथून निघणाऱ्या फेरीचे उद््घाटन जिल्हाधिकारी रणजित कुमार करणार आहेत. त्यानंतर बालमजुरीविरोधी स्वाक्षरी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. १२ ते १९ जूनपर्यंत होणाऱ्या या सप्ताहात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबिर, बालक-पालक मेळावा आदी कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती प्रकल्प संचालक अपर्णा बनसोडे यांनी दिली.

दगड..दगड...
‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटात स्वत: गायलेले ‘दगड... दगड’ हे गाजलेले गीतही ही मुले सादर करणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाहिन्यांवरील मालिका, रिअॅलिटी शोमध्ये त्यांना जावे लागले. तेथील अनुभवही ही मंडळी सांगणार आहेत. आम्ही शिक्षणाला महत्त्व देतो. त्यानंतर स्वत:च्या कलेला वाव देतो, असे हे चिमुकले नेहमीच सांगतात.
बातम्या आणखी आहेत...