आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडवेत बालविवाह रोखला, नववीत कन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिला बालविकास कार्यालयातील पथकाने पोलिसांच्या मदतीने मांडवे (ता. माळशिरस) येथील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा बालविवाह शुक्रवारी रोखण्यात अाला. चाइल्ड लाइनच्या श्री. ढेपे यांनी यासंदर्भातील माहिती महिला बालविकास कार्यालयाच्या निर्दशनास आणली.

मोलमजुरी करणाऱ्या माता-पित्याने नववीच्या वर्गात शिकत असलेल्या कन्येचा विवाह उरकण्याची तयारी शुक्रवारी केलेली होती. महिला बालविकास अधिकारी डी. पी. शाहू, नितीन थोरात यांच्यासह पथकाने विवाह सुरू होण्यापूर्वीच मांडवे गाव गाठले. मुलीच्या पालकांकडे वयाचे पुरावे मागितल्यानंतर सर्वचजण गडबडले. पथकातील पोलिसांनी बालविवाह कायद्यानुसार कारवाई करून मुलीस ताब्यात घेतले. तिला बालसुधारगृहाकडे सोपवले अाहे.

या पथकाने केली कारवाई : सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, विजय मेतकूर, मुख्य सेविका डोंगुर्ले, अंंगणवाडी सेविका, परिविक्षा अधिकारी एम. एम. अष्टेकर, प्रकल्प अधिकारी साधू चांदणे बाल समिती सदस्या योजना कामतकर.

ग्रामसेवक बेपत्ता
बालविवाह प्रतिबंधक २००३ अधिनियमानुसार गावातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची अाहे. मात्र गावात ग्रामसेवकच हजर नव्हते.

सतर्कता बाळगावी
वस्तीत अथवा गावात बालविवाह केले जात असतील तर नागरिकांनी महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा. ग्रामसेवक हे विवाह निबंधक असल्याने त्यांनी याकडे लक्ष पुरवणे अपेक्षित अाहे. डी. पी. शाहू, महिलाबाल विकास अधिकारी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...