आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्दाफाश, हाडांचा भयान दर्प, गुदमरणाऱ्या चिमुकल्यांची छाप्यानंतर सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील हाडाची भुकटी तयार करण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी बालकामगारांकडून हाडाची भुकटी तयार करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान जीवघेणा दर्प कारखान्याच्या परिसरात तीन ते चार किलोमीटरपर्यंत येत असल्यामुळे कारखाना बंद करण्यासाठी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून लढा देत आहेत.
इटकळ गावापासून सुमारे दीड किलोमीटरवर हा कारखाना गेल्या आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. येथे सुरुवातीला काही दिवस अत्यंत कमी स्वरूपात कारखान्याची भुकटी करण्यात येत होती. यामुळे याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे मोठ्याप्रमाणात हाडांची भुकटी करण्याचे काम करण्यात येत होते. बालकामगारांच्या माध्यमातून येथे हाडाची भुकटी तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या मार्गदर्शनात इटकळ दूरक्षेत्र पोलिस चौकीतील हवालदार आर. जी. सातपुते, एन. एच. वाघमोडे, डी. एच. ससाणे, एम.बी.पवार आदींनी येथे छापा मारला. तेव्हा मिळालेली माहिती खरी असल्याचे आढळून आले. तेथून परप्रांतातील सहा तर स्थानिकच्या एका बालकामगारांना पोलिसांनी अटक केली. पोलिसमित्र विष्णू बंडगर, राजकुमार गायकवाड यांच्या मदतीने यासंदर्भात कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी पोलिसांनी तीन टेम्पो (एमएच २५, ८३०५, एमएच १३, आर ४८०६, एका वाहनाचा क्रमांक नमूद नाही) जप्त केले आहेत. दरम्यान हा कारखाना बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिले आहेत. मात्र, केवळ अदखलपात्र कारवाई करण्यात येते. यामुळे काही दिवस कारखाना बंद राहतो. नंतर मात्र, काही दिवसांनी पुन्हा कारखाना सुरू करण्यात येतो. उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी शिवारात असेच कारखाने सुरू होते. परिसरातील चार गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन कारखान्यांच्या विरोधात लढा दिला होता. यामुळे हे कारखाने आता बंद करण्यात आले आहेत. इटकळ शिवारातील हाडाच्या कारखान्यामुळे नागरिक वैतागले होते.
रात्री होते काम
रात्रीच्यावेळी मात्र माेठ्य प्रमाणात हाडांची भुकटी तयार करण्याचे काम करण्यात येते. स्थानिकांच्या माहितीनुसार रोज चार ट्रक मोठे टेम्पो भरून हाडे येथे आणली जातात.

कारवाई करणार
-हाडापासून भुकटीतयार करण्याच्या या कारखान्याच्या मालकावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येथे पोलिसांच्या छाप्यात सात बालकामगार आढळून आले आहेत. याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
-रमाकांतपांचाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, नळदुर्ग,

शेतीतजाणे सोडले
-कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शेतात जाणे बंद करावे लागले आहे. तसेच जीवघेण्या दर्पामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकजण आजारी पडले आहेत. कारखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. -नागनाथस्वामी, स्थानिक शेतकरी.
नियम धाब्यावर
गावाच्या गट नंबर २६८ मध्ये सैफन कुरेशी ( रा. सोलापूर) यांचा हा कारखाना आहे. या कारखान्याची कोणतीही नियमानुसार कागदपत्रे नसल्याचे समजते. तसेच प्रदूषण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा कारखाना चालवला जात आहे. याकडे महसूल अन्य यंत्रणांचे मोठे दुर्लक्ष आहे. हा कारखाना तातडीने बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

हाडेच हाडे
हाडेउघड्यावरच असल्याने कुत्रे ही हाडे परिसरातील शेतात चोखून टाकतात. यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ एकर शेतीमध्ये हाडेच हाडे पसरलेली दिसून येत आहेत.
इटकळमध्ये कारखाना परिसरात हाडामांसाचे ढीग लागले आहेत.
बातम्या आणखी आहेत...