आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी चीन अर्थसहाय्य करणार, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्ट सिटीसाठी चायना मदत करणार आहे. दिल्लीत ११ १२ जानेवारी रोजी यूएसए आणि चायना या देशातील नियाेजनाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्या कार्यशाळेत उपमहापौर प्रवीण डोंगरे सहभागी झाले होते. त्याबाद्दल बोलताना ते म्हणाले, सांडपाणी, पाणीपुरवठा, नागरी आरोग्य, शहरातील नियोजन आदी मािहती देण्यात आली. लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि शासनाची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. चीन शहरात पाच वर्षात हाेणारे बदल यांची मािहती तेथील तज्ज्ञांनी दिली.

स्मार्ट सिटीत शहराचा समावेश असल्याने सोलापुरातील माहिती उपमहापौर डोंगरे यांनी तेथे दिली. शहरातील सीटीपी प्लॅट, बायोएनर्जी प्रकल्प, खत निर्मिती, पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यास शहरात काय बदल होईल याची माहिती तेथे दिली. या कार्यशाळेत देशातील ३५ शहराचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, अशी माहिती उपमहापौर डोंगरे यांनी दिली.