आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांना रोखीने वेतन द्या, कॅशलेस नको; विडी कामगार सेनेचा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटाबंदीमुळेविडी कामगारांना रोखीने मजुरी देण्याच्या मागणीसाठी विडी कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र राज्यातील युतीचे सरकार कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना स्थानिक कामगार नेते कॅशलेसचा विरोध करत आहेत.

निवेदनात महिला विडी कामगारांना लागणाऱ्या आठवड्याची मजुरीइतकी रक्कम कारखानदारांना उपलब्ध करून द्यावी, विडी कंपन्यांचे खाते असलेल्या बँकेत संबंधित विडी कामगारांचे खाते उघडून देण्यासाठी संबंधित बँकांना आदेश द्यावेत, महिला विडी कामगारांना ५० किलो धान्य मोफत द्यावे, महिला विडी कामगारांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, कारखान्यांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन रोखीने मजुरी देण्याचे आदेश द्यावेत आदी मागण्यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...