आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार्टमेंटमधील नागरिकांनी पाळत ठेवून पकडले चोराला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अपार्टमेंटच्यावाहन पार्किंगमधील दुचाकीची बॅटरी, प्लगपीन, पेट्रोल चोरीला जात होते. यावर उपाय म्हणून रहिवाशांनी पाळत ठेवली अन् पेट्रोल चोरताना एकाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार रविवारी उघडकीस आली.

प्रभाकर महाराज मंदिराजवळील सद्गुरू कृपा अपार्टमेंटमध्ये राहणारे विठ्ठल झंवर यांच्या दुचाकीतून पेट्रोल चोरताना एका तरुणाला पकडले. सनी दत्तात्रय शिंदे (वय २४, रा. प्रभाकर महाराज वस्ती, जुना कारंबा नाका, सोलापूर) याला अटक झाली. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमाराला सनी हा अपार्टमेंटमध्ये येऊन दुचाकीच्या (एमएच १३ एएम ५३४१) टाकीतून पेट्रोल काढत होता. त्यावेळी झंवर यांनी पाळत ठेवून त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हवालदार तानाजी काशीद यांना विचारले असते, या संकुलातील गाड्यांचे विविध पार्ट, पेट्रोल चोरीला जात होते. आमच्या कडे तक्रारी आल्यामुळे आमचेही पेट्रोलिंग पथक होते. आज मध्यरात्री झंवर यांनी पाळत ठेवली होती. दुचाकीतून पेट्रोल काढताना त्याला पकडले. जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. संशयित सनी याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीनंतर जामीन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या मार्गावर होतात प्रकार
होममैदानाजवळील रसपानगृह ते फडकुले सभागृह या मार्गावर हरिभाई शाळा ते पंचकट्टा मैदान मार्गावर (प्रशासकीय इमारतीसमोरील रस्ता) आणि होम मैदान परिसरात सायंकाळनंतर या घटना घडतात. साध्या वेषातील पोलिसांचे पेट्रोलिंग पथक पाहिजे. तसेच संशयितांची चौकशी पोलिसांकडून व्हावी.

होम मैदान परिसरात जबरी चोरीचे प्रमाण वाढले
होममैदान परिसरात नागरिकांना अडवून पैसे, मोबाइल, सोनसाखळी हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी छत्रबंद नावाच्या व्यक्तीला मारहाण करून सोनसाखळी मोबाइल हिसकावण्यात आले. या प्रकरणात तिघांना अटक झाली. मागील महिन्यात एका व्यापाऱ्याला मारहाण करून मोबाइल पळविण्यात आले होते. अनेकदा मोबाइल हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. पण, या घटना पोलिसांपर्यंत आल्या नाहीत.