आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेसी क्रॅक : कंपनीला नोटीस देण्याचा निर्णय,चेसी बदलून दिल्यास न्यायालयात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डबघाईला आलेल्या महापालिका परिवहन विभागातील ८८ सिटीबस चेसी क्रॅक प्रकरणी, अशोक लेलँड कंपनीला १५ दिवसांची नोटीस देऊन, त्यानंतर चेसी बदलून दिले नाही तर कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय तीन तास चालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या विषयावर भाजपचे नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी महापालिका प्रशासनाला कोंडीत धरले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सूचनेत बदल करावा लागला.
महापालिकेची फेब्रुवारी महिन्यातील तहकूब सभा शुक्रवारी झाली. परिवहन विभागाला केंद्राच्या जेएनयूआरएम योजनेतून १४४ बस मिळाल्या अाहेत. त्यातील ८८ बसच्या चेसी क्रॅक आहेत. त्या बसला इन्फोर्समेंट किट बसवून वैधता प्रमाणपत्र दिल्यास त्या बस रस्त्यावर आणता येतील, असा प्रस्ताव सभेुपढे होता. त्यावर नगरसेवक उदय चाकोते यांनी चेसी बदलून घ्या असे म्हणणे मांडले. यावर भाजपचे नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी इन्फोर्समेंट किट बसल्यास आरटीओ मान्यता देणार नाही असे सांगितले. हा प्रस्ताव आयुक्तांमार्फत सभागृहात येणे अपेक्षित असताना सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्यामार्फत पाठवण्याची घाई का केली? त्यांना अधिकार कोण दिला, असा सवाल उपस्थित केला.

न्यायालयात गेल्यास विलंब होतो असे प्रस्तावात का म्हटले, न्यायालयात न्याय मागत कंंपनीवर फौजदारी करावी. तसेच आयुक्तांनी प्रस्ताव मागे घ्यावा, असे मत निंबर्गी यांनी मांडले. त्यास आयुक्तांनी सहमती दर्शवली. परिवहनमध्ये बुद्धिवंतांनी केलेला घोटाळा असे माजी महापौर सपाटे म्हणाले. याप्रकरणी अशोक लेलँड कंपनीला पंधरा दिवसांची नोटीस देऊन चेसी बदलून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करावी. तसेच बस खरेदी प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव महापालिका सभागृहात एकमताने पारत झाला.

मनपा सेवकांचा प्रश्न निकाली
सहा एप्रिल १९९५ नंतर मनपा सेवेत असलेल्या रोजंदारी सेवकांच्या यादीस मान्यता देण्यात आली. तसेच सेवा प्रवेश आणि वयोमर्यादा अट शिथिल करण्यात आली. यामुळे मनपा सेवकांचा प्रश्न निकालात निघाला. यामुळे कर्मचारी संघटनेचे भारत वडवेराव यांनी सर्वांचे आभार मानले.
या विषयांनाही मिळाली मंजुरी

{स्वच्छ भारतमिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधणे
{स्मशानभूमीसरखवालादारांचीनेमणूक करणे
{मार्कंडेयउद्यानातस्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध शिल्प उभा करणे.
{कचरामक्तेदारांचीमाहिती १५ दिवसांत मागवणे
{बाळ्यातकै.आबासाहेब मल्हारराव पाटील यांचा अर्धपुतळा बसवणे.