आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेसी क्रॅक दुरुस्तीसह लाइफ टाइम वाॅरंटीची घातली अट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिटीबस चेसी क्रॅक प्रकरणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात कंपनीच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांची बैठक घेतली. जेएनयूआरएम योजनेअंतर्गत अशाेक लेलँड कंपनीच्या ९९ जनबस आल्या. त्यापैकी ५९ बसच्या चेसी क्रॅक झाल्याने ही बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी ठोस भूमिका घेतली. कंपनीपुढे तीन मागण्या ठेवल्या. त्यावर येत्या चार दिवसांत निर्णय देण्याचे आदेश दिला. यावेळी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, अशोक लेलँड कंपनीचे अधिकारी आर. नागराजन, पी. डी. जोशी, परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे, आरटीओ बजरंग खरमाटे, नगरसेवक अशोक निंबर्गी, संजय कोळी, राजकुमार पाटील, परिवहन समिती सदस्य अनिल कंदलगी, आनंद मुस्तारे आदी उपस्थित होते.

जेएनयूआरएम योजनेअंतर्गत ९८.५९ कोटींच्या १४४ बस आॅक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत आल्या. त्यापैकी ९९ जनबस आहेत. या बसबाबत बॅटरी बाॅक्स, व्हील, हब बेअरिंग, इलेक्ट्रिक वायरिंग शाॅर्ट होणे आदी तक्रारी होत्या. त्यापैकी बॅटरी बाॅक्स कंपनीकडून बदलून देण्यात येत आहे. जनबसची तपासणी १७ १८ आॅक्टोबर आणि ११ डिसेंंबर रोजी केली असता, ५९ बसच्या चेसी क्रॅक असल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या गाड्या मार्गावर धावू शकल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेचे नुकसान झाले. प्रवाशांना सेवा देता आली नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने मांडली.

वरिष्ठ पातळीवर घेणार बैठक
५९ बसच्या चेसी क्रॅक झाल्याने बैठक घेण्यात आली. कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना सूचना आणि मुदत दिली. त्यामुळे त्यांच्याकडून बस दुरुस्ती हमी आणि एआरएमआय संस्थेकडून देण्याचे आदेश दिले. पुढील निर्णयाकरिता परिवहन आयुक्तांकडे बैठक घेण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री