आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरामुक्तीतून सिटी कंपोस्ट, टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्राच्या रसायन खत मंत्रालयाने ‘सिटी कंपोस्ट’ ही संकल्पना मांडली आहे. त्याला चालना देण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय सुकाणू समिती नेमली आहे. या विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष असतील. कृषी आयुक्त, फलोत्पादन अायुक्तालय, राष्ट्रीय रसायन खत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदी त्याचे सदस्य असणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेचे संचालक या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार अाहेत.

कशी आली संकल्पना?
केंद्राच्यानगरविकास मंत्रालयाने कचरा व्यवस्थापनासंबंधी सर्व्हे केला अाहे. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार ६२० एलएमटी एकूण कचरा निर्माण होतो. त्यापैकी फक्त २० टक्के नागरी घनकचऱ्याचे रूपांतर सिटी कंपोस्टमध्ये केले जाते. त्यात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. राज्यस्तरीय सुकाणू समितीने यावर काम करायचे अाहे.

कशी अाली संकल्पना?
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या रस्ते बांधणीत वापरावयाच्या डांबरात निरुपयोग प्लास्टिक वापरण्याचे आवाहन केले. याबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांनी लक्ष घातले. याबाबत केंद्रीय रस्ते संशोधन (नवी दिल्ली)ने मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व मुख्य अभियंत्यांना सूचना पाठवण्यात आल्या. त्यातून एक प्रयोग यशस्वी झाला.
या मुद्द्यांवर होणार विचार
१. सिटी कंपोस्ट उत्पादित करणाऱ्या प्रकल्पाचे, खत विपणन कंपनीसोबत टॅगिंग करणे
२. कृषी फलोत्पादन क्षेत्रात सिटी कंपोस्टच्या वापराला चालना देण्यासाठी नीती आखणे
३. राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या सिटी कंपोस्टच्या उच्चतम विक्री दरावर नियंत्रण ठेवणे
४. नागरी घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करणार
५. खंत कंपन्यांना विक्रीत मदत करणे, वितरणासाठी यंत्रणेकडून आवश्यक प्रमाणपत्रे देणे
६. सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सर्व महापालिकांना आवश्यक ते सर्व साहाय्य करणे

या बाबींकडे दुर्लक्ष होणार नाही
१.वेस्ट प्लास्टिकचा वापर केल्याने कामाच्या किमतीत बचत होत असल्याची खात्री करणार
२. भारतीय रस्ते महासभेने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच रस्त्यांचे काम व्हावे
३. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी दर्जाबाबत तपासणी करून त्याचा अहवाल देणे
४. काम करताना जवळच्या क्षेत्राची निवड करावी. जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रित करता येईल
५. वेस्ट प्लास्टिक एकत्र करून त्याचा डांबरात वापर करावा. ते एकजीव होऊ द्यावे. नंतर वापरावे
६. संबंधित शहर नगरपालिका क्षेत्रात प्लास्टिकचा कचरा कमी करण्याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न
बातम्या आणखी आहेत...