आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमारांचा वाढदिवस: शरद पवार सोलापूरात पोहोचले, काहीच वेळात राष्‍ट्रपतीही येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री, अाजी-माजी मंत्री सोलापुरात रविवारी येत अाहेत. यामुळे पोलिस यंत्रणांकडून सुरक्षिततेची काळजी घेतली जात अाहे. शहराला जणू पोलिस छावणीचे स्वरूप अाले अाहे. दरम्‍यान, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सोलापुरात पोहोचले आहेत.

शनिवारी दुपारी विमानतळ ते पार्क चौक या मार्गावर वाहन ताफ्यांची रिहर्सल झाली. राष्ट्रपतींचा वाहनताफा जाताना जागोजागी पोलिसांचा लागणारा बंदोबस्त, ताफ्यातील बीडीडीएस पथक, जॅमर वाहन, अग्निशामक दल, वैद्यकीय पथक, सुरक्षा यंत्रणा वाहनांची रिहर्सल झाली. किती मिनिटात वाहनताफा विमानतळ ते पार्क मैदानावर पोहोचेल याचा अंदाज घेण्यात अाला. काही काळ वाहतूक बंद होती. पन्नास ते शंभर मीटर अंतरावर दुतर्फा पोलिस पाॅइंट लावले होते. दुपारी तीनच्या सुमाराला विमानतळावरून ताफा निघाला. साधारण वीस ते पंचवीस मिनिटात ताफा मैदानावर अाला.
पुढे वाचा..
> वाहतूक काही काळासाठी बंद
>या ठिकाणी अाहे पार्किंग
>जागोजागी पोलिस
>शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी सजले सोलापूर
फोटो - दत्तराज कांबळे
बातम्या आणखी आहेत...