आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७ मजल्यांपर्यंत बांधता येईल अपार्टमेंट अन् एफएसआय १.१

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र शासनाने शहर विकास नियमावलीत बदल करणारी अधिसूचना नुकतीच काढली. सोलापूरसह वर्गातील १४ महापालिकांना ती तत्काळ लागू करण्याचे अादेश त्यात िदले अाहेत. या नव्या नियमावलीत एकूण परिसर, रस्ते, पाणी, बांधकामाची उंची, विविध प्रकारच्या बांधकामांची, मोकळी सोडावयाची जागा याची सविस्तरपणे मांडणी केली अाहे.
नगर विकास खात्याने महाराष्ट्र नगर रचना कायदा १९६६ मध्ये दुरुस्ती केली आहे. २० सप्टेंबर २०१६ रोजी या संदर्भातील अादेश काढण्यात अाला अाहे. या नव्या नियमावलीत शासनाने एफएसअाय देताना हात अाखडता घेतला अाहे.

क्रेडाईने १.३ एफएसअायची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात १.१ इतकाच एफएसअाय शासनाने मंजूर केला. पण हे करताना ५० मीटरपर्यंत म्हणजे १७ मजल्यापर्यंत अपार्टमेंट बांधता येतील, अशीदुरुस्ती केली अाहे. सध्याच्या नियमात साधारण ३२ मीटर म्हणजे केवळ १४ मजल्यापर्यंत बांधकामाची परवानगी होती.

अाता नव्या एफएसअाय नियमानुसार एक हजार चौरस मीटर जागा असेल तर त्यावर हजार १०० चौरस मीटर बांधकाम करता येणार अाहे. मात्र अपार्टमेंट उंचीचे बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना बाल्कनी, पार्किंग, पाण्याची सोय, इलेक्ट्रिकची सोय, जीना अादीबाबतचा प्रिमियम भरावा लागेल त्यासाठीही परवानगी घ्यावी लागेल.

साईड फ्रंट मार्जिन पूर्वी नऊ मीटर होते. ते अाता सहा मीटर केले अाहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला अाहे. ३६ मीटरपासून पुढील उंचीच्या बिल्डिंग परवानगीसाठी महापालिकेच्या बांधकाम परवानगी देणाऱ्या उच्चस्तरीय समितीची मंजुरी अावश्यक करण्यात अाली अाहे. अशा प्रकारच्या तीन कमिट्या स्थापन करण्याची सूचना नव्या नियमावलीत अाहे.
या महापालिकांना लागू झाली नियमावली
सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला नांदे-वाघाळा, अौरंगाबाद, परभणी, लातूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, अहमदनगर, धुळे, मालेगाव.
बातम्या आणखी आहेत...