आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनचा आज संप, हजारो प्रवाशांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सहावा वेतन आयोग लागू करा, दिवाळी अॅडव्हान्स द्या आदी मागण्यांसाठी महापालिका परिवहन कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत.ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील सुमारे ४४ हजार प्रवाशांचे या संपामुळे हाल होणार आहेत. सोमवारी तोडगा निघाल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कामगार महापौर सुशीला आबुटे यांनी परिवहन कामगार संघटनेची बैठक बोलवली आहे.दरम्यान परिवहन व्यवस्थापकांनी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

महापौर निवासस्थानी बैठक : संपावरतोडगा काढण्यासाठी महापौर आबुटे यांनी सोमवारी सायंकाळी शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीत तोडगा निघाला नाही. सिटीबसने दररोज ४४ हजार प्रवासी प्रवास करतात. यातून परिवहनला लाख रुपये उत्पन्न मिळते.
सहाव्या वेतन आयोगाच्या अधिन राहून दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा विचार झाला तर आम्ही संप मागे घेऊ. नरसय्या आडम, माजी आमदार
बातम्या आणखी आहेत...