आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिव्हिल'च्या रक्तपेढीत फक्त ४० पिशव्या रक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमधील रक्तपेढीत विविध रक्तगटांच्या ४० पिशव्या उपलब्ध आहेत. आवश्यक त्या प्रमाणात रक्तदात्याकडून रक्त मिळत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत आहे. रक्तपेढीची साठवण क्षमता ४०० असून त्यापैकी फक्त २० टक्केच रक्तसाठा स्टोअरेजमध्ये उपलब्ध आहे.

सध्या ए, बी, एबी, या रक्तगटाचा साठा उपलब्ध आहे. तसेच निगेटिव्ह एबी निगेटिव्हच्या पिशव्या एवढा साठा उपलब्ध आहे. साठविण्याची क्षमता जास्त असली तरी रक्तदान शिबिरातून आवश्यक तेवढे रक्त दात्यांकडून मिळत नाही, म्हणजे रक्तदान शिबिरात दाते सहभागी होत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या मागणीनुसार पुरवठा करता येत नाही.
रक्तदानातून जमा रक्त फक्त ३५ दिवसांपर्यंत ठेवण्यात येते. त्यानंतर जमा केलेले रक्त उपयोगात आणता येत नाही. वारंवार रक्तदान शिबिरे घेऊन साठा उपलब्ध ठेवला जातो. शासकीय रक्तपेढीला फक्त १५ ऑगस्ट २६ जानेवारी ला रक्तदान शिबिरासाठी आमंत्रण देण्यात येते. एरव्ही रक्तपेढीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रक्तपेढीत रक्तसाठा होत नाही.