आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिव्हिलचे बंद असलेले गेट होणार खुले, ब्लॉकचे गेट जुलैपासून सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या कारणामुळे कंकूबाई हास्पिटलसमोरील गेट बंद ठेवले आहे. येण्या जाण्यासाठी मुख्य प्रवेशाद्वाराचा वापर सुरू आहे. सिव्हिल प्रशासनास अनेक संघटनांनी निवेदन देऊन गेट सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सिव्हिल प्रशासनाकडून जुलैपासून ब्लॉकच्या समोरील गेट फक्त जाण्यासाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. औदुंबर मस्के यांनी दिली.
सिव्हिलमध्ये येणे- जाण्यासाठी एकाच गेट सुरू असल्याने रुग्ण नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मुख्य प्रवेशव्दार जवळ वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सिव्हिलमध्ये सीबीआय सेक्युरिटी ऑडिट केले. त्यामुळे संबंधित अधिका ऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीची गेट उघडे ठेवणे हानीकारक असल्याचे सांगितले. फक्त येण्या जाण्यासाठी गेट सुुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. परंतु सिव्हिल प्रशासनाकडून एक महिन्यापासून एकाच प्रवेशद्वारामधून येणे जाणे केले जात होते. आता बाहेर जाण्यासाठी आत जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार राहतील.

आरोपीवर गोळीबारामुळे बंद केले होते गेट
सिव्हिलमधील ब्लॉकच्या जवळ असलेले प्रवेशद्वार एका अारोपीवर गोळीबार झाल्यापासून बंद आहे. आजतागायत ते प्रवेशव्दार बंदच होते. जाण्यासाठी प्रवेशद्वार आता खुले करण्यात येईल. परंतु अनेक वर्षापासून ब्लॉकच्या गेट समोर आतील बाजूस अनधिकृत रुग्णवाहिका थांबविण्यात येतात. त्या रुग्णवाहिकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची सिव्हिल प्रशासनाकडून काळजी घेणे गरजचे आहे.कारण या वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो.

वाहतुकीची कोंडी कमी होईल
सिव्हिल प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कंकूबाई समोरील प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे सात रस्ता, पाच्छा पेठ, गांधी नगर, सदर बझार, गुरुनानक चौक, कुमठा नाका आदी भागातून येणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, रुग्ण रुग्णांचे नातेवाईक यांना वसंतदादा पाटील पुतळ्यासमोरील सिग्नल पार करून मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करावा लागत होता. परंतु जाण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार खुले केल्याने मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर होणारी ट्राॅफिक जाम कमी होण्यास मदत होईल.
बातम्या आणखी आहेत...