आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत सर्वेक्षण : तक्रार निवारणात राज्यात सोलापूर चाैथे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी ५०० शहरांत सोलापूरचा समावेश असून, त्याअंतर्गत अॅप डाऊनलोड करून त्यावरून आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरात पाच हजार १४० जणांनी अॅप डाऊनलोड केले. मात्र त्यावरून तक्रार येण्याची संख्या कमी आहे. सोलापूर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. तर देशात ३० व्या स्थानी आहे. सोलापूरला २१३५ गुण मिळाले आहेत. देशात अहमदाबाद प्रथम क्रमांकावर आहे. 
सर्वेक्षणासाठी स्वच्छता अॅप केंद्र सरकारने काढले असून, ते डाऊनलोड करून त्यावरून तक्रारी घेणे आणि निराकरण करणे हा उद्देश होता. सोलापुरात अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या पाच हजार ४१० इतकी आहे. मात्र तक्रार करण्याचे प्रमाण कमी आहे. 

पालिकेस एकूण २० गुण 
२५ गुण मिळाले असते तर टाॅप दहामध्ये आले असतेे. २० गुण मिळाल्याने महापालिका ३०मध्ये पात्र ठरली. आतापर्यंत ५४३ तक्रारी अॅपद्वारे आल्या. त्यापैकी ३६३ सोडवल्या तर ६२ मार्गावर आहेत. उरलेल्या सोडवणे बाकी आहे. 

अहमदाबाद - ५५२४९ 
सुरत - ४९५७२ 
राजकोट - २७९६६ 
नवसारी - २५४७० 
धनबाद - २४७०० 
राज्यातील
टाॅप शहरे 
पुणे- ५१७३ 
नवी मुंबई - ४९२७ 
बृहन्मुंबई - ४१०० 
सोलापूर - २१३५ 

अहमदाबाद प्रथम 
देशात अहमदाबाद तर राज्यात पुणे शहर प्रथम क्रमांकावर आहे. साेलापूर देशात ३० व्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी दोन हजार १३५ गुण सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत मिळाले होते. त्यात अॅप डाऊनलोडसाठी १८०५, लाइक करण्यासाठी ३४ तर केलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी २१५ गुण मिळाले आहेत. 

नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा 
^शहरात स्वच्छभारत सर्वेक्षण होणार असून, परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. शहरात कायम स्वच्छता राहण्यासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे.” अभिजितहरळे, मनपा सहायक आयुक्त, आरोग्य विभाग 

पथकाकडून होणार पाहाणी 
स्वच्छ सर्वेक्षण पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक ११ ते १३ जानेवारी रोजी येणार आहे. दरम्यान सिद्धेश्वर यात्रा आहे. पथक शहरासह हद्दवाढ भागात जाऊन पाहणी करेल. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्रे केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...