आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडीमध्ये श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - कै.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या बार्शी परंडा तालुक्यातील विविध गावांतील सुमारे ५०० अनुयायी - श्री सदस्यांनी एकत्र येत बार्शी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे शहरातील रस्ते रविवारी चकाचक दिसत होते. कै. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची ज्येष्ठ निरूपणकार म्हणून ओळख होते. प्रसिद्धीपासून दूर राहत समाजाचे प्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. अध्यात्माबरोबरच शिक्षण, आरोग्य व्यसनमुक्तीसाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी हे त्यांचा समाजप्रबोधनाचा वारसा पुढे चालवत आहेत.
रेवदंडा (जि. रायगड) येथील नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानचे बार्शी परंडा भागातही मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. या प्रतिष्ठानच्या बार्शी, खांडवी, लोणी, शेंद्री, भोइंजे, परंडा, शिराळा येथील सुमारे ५०० अनुयायांनी एकत्र येऊन रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून शहरात स्वच्छतेस प्रारंभ केला. वेगवेगळे गट करून शहराच्या विविध भागात जाऊन त्यांनी रस्ते झाडले. रस्त्याच्या दुतर्फा जंतुनाशक पावडर टाकली. तसेच कचरा एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली. नगरपालिकेच्या प्रशासनानेही कचरा गोळा करण्यासाठी वाहने पाठवून श्री सदस्यांनी एकत्र केलेला कचरा नगरपालिकेच्या वाहनातून नेण्यात आला. प्रतिष्ठानच्या या अनुयायांनी शहरातील स्वच्छता तर केलीच. परंतु येथील नागरिकांना आपल्या कार्यातून शहर स्वच्छतेचा संदेशही दिला. श्री सदस्यांनी रविवारी दिवसभर आयोजिलेल्या स्च्छता मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. स्वच्छतेनंतर कचऱ्याची विल्हेवाट लावली, ही बाब महत्त्वाची आहे.

^श्री सदस्यांनीराबवलेली स्वच्छता मोहीम खरोखर वाखाणण्याजोगी आहे. अशी स्वच्छता प्रत्येकाने केली पाहिजे. नगरपरिषदही एक महिन्याला तरी अशी स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे.” अरुण शेटे, नागरिक,कुर्डुवाडी

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे दूत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी शहरात स्वच्छता केली. नगरपरिषद आजपर्यंत स्वच्छ करू शकली नाही ते श्री सदस्यांनी स्वच्छ करून दाखवले आहे. सुमारे ८४ टन कचरा गोळा करण्यात आला. ७०० श्री सदस्यांनी शहरातील पाच प्रभागांतील गांंधी चौक, शिवाजी चौक, टेंभुर्णी रोड, माढा रोड, बसस्थानक परिसर, मार्केट यार्ड, हिंदू स्मशानभूमी आदी भागांतील कचरा साफ केला.

प्रसिद्धीपासून दूर राहत घेतली स्वच्छता मोहीम
प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शहर स्वच्छता मोहिमेचा कोणताही डामडौल केला नाही. प्रसिद्धी पराङ्मुख राहून त्यांनी हे कार्य केले. नागरिकांना त्यांचे हे कार्य भावले. प्रतिष्ठानच्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले.
बातम्या आणखी आहेत...