आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० हजार साधकांच्या हाती झाडू, ३१५ टन कचरा दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वार रविवार. वेळ सकाळी सातची. कपाळावर गंध. मुखात जय सद्गुरु आणि हाती खराटा. १० हजारांहून अधिक साधकांनी शहरातील रस्ते गजबजलेले. अनेकांच्या हाती स्वच्छतेविषयी प्रबोधन करणारी फलके. शहराच्या कोणत्या भागात कोणी स्वच्छता करायची याच्या ठरल्याप्रमाणे सूचना देणे सुरू. आणि त्यानंतर सुरू झाले स्वच्छतेचे महाअभियान. दुपारपर्यंत शहारातील जवळपास १७२ िकलोमीटर मार्ग स्वच्छ करण्यात आला आणि तब्बल ३१५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अभियानाची सुरुवात रविवारी सकाळी साडेसात वाजता शिवाजी चौकातून झाली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी देशातील ८५ शहरांत एकाच वेळी अशी मोहीम राबवण्यात आली. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली राजस्थान आदी राज्यांतील काही शहरांचा समावेश होता.

या मार्गांवर झाली स्वच्छता
शिवाजीचौक, जुना पुना नाका, अवंती नगर, तरटी नाका पाेलिस चौकी, गांधीनाथा प्रशाला, बाळीवेस, टिळक चौक, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंेद्र चौक, जोडबसवणणा चौक, सिव्हिल हॉस्पिटल, जी.एम.चौक, सम्राट चौक, मंत्री-चंडक पार्क, रूपाभवानी चौक, दयानंद कॉलेज, जोडभावी पोलिस चौकी, कुंभारवेस, मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, किल्ला रोड, डीसीसी बँक, लकी चौक, पार्क चौक, सिध्देश्वर प्रशाला, जिल्हा परिषद, सिध्देश्वर तलाव परिसर, भागवत टॉकीज, नवी वेस पोलिस चौकी, जुनी मिल चाळ, भय्या चौक, डीआरएम ऑफिस, सात रस्ता ते रंगभवन , काँग्रेस भवन, रूपाभवानी मंदिर, बलिदान चौक, मंगळवार पेठ चौकी, सराफ कट्टा, टिळक चौक, समाचार चौक, बाराईमाम चौक, विजापूर वेस, बेगम पेठ पोलिस चौकी, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय रोड,किडवाई चौक, सोशल कॉलेज, जेलरोड पोलिस स्टेशन, बालाजी मंदिर, प्रभाकर महाराज मंदिर, सम्राट चौक, नीला नगर, कस्तुरबा मार्केट, बलिदान चौक, कुंभारवेस , नाथ प्राइड , सिध्दार्थ चौक, लष्कर, गांधी नगर, पोलिस आयुक्तालय, गुरुनानक चौक, अासरा चौक, नई जिंदगी परिसर, डीमार्ट, म्हाडा कॉलनी, आयएमएस शाळा, सैफुल, इंचगिरी मठ, नेहरू नगर, कमला नगर, प्रतापनगर, माशाळ वस्ती, मार्कट यार्ड.

शहरातील १७ मार्गांवर राबवण्यात आली मोहीम
प्रतिष्ठानच्या वतीने साधकांना हॅण्डग्लोज आणि तोंडावर लावण्यासाठी मास्क देण्यात आले होते. यासाठी सोलापुरातील १७ मार्ग निवडण्यात आले होते. प्रत्येक मार्गावरील रस्त्यांची सदस्यांनी स्वच्छता केली. जमा झालेला कचरा महापालिकेच्या घंटा गाडी तसेच कचरा उचलणाऱ्या वाहनातून गोळा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...