आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोन अधिकारी म्हणतात, रोज दोन वेळा घंटागाड्या फिरतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - झोनक्रमांक मधील बराच भाग शहरातला आहे. या भागात सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा घंटागाड्या फिरून कचरा उचलतात, असा दावा झोन अधिकारी करत आहेत. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की आठवड्यातून एकदाच घंटागाड्या फिरतात.
साखर पेठ, भद्रावती पेठ, रविवार पेठ, दाजी पेठ, पोलिस मुख्यालय, पाथरुट चौक, मौलाली चौक, कुर्बानहुसेन नगर, गेंट्याल चौक, विकास नगर आदी भाग झोन क्रमांक मध्ये येतो. हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे येथे कचरा गोळा करण्याचे नियोजन उत्तम असायला हवे. या परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता आठ ते दहा दिवसांतून एकदा घंटागाडी येत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या परिसरातील कचराकुंडीत कचरा साठण्याचे प्रमाण जास्त आहे. कचराकुंडीत कचरा साचल्यामुळे हा कचरा रस्त्यावर पसरत आहे.

अधिकाऱ्यांचे नियोजन राम भरोसे : घंटागाड्यांच्यानियोजनाबाबत विचारले असता झोन अधिकारी म्हणतात, दररोज सकाळी तीन आणि दुपारी तीन खेपा केल्या जातात. मुख्य आरोग्य निरीक्षकांना विचारले असता ते म्हणाले, “दररोज दुपारी बाराच्या आत सहा खेपा केल्या जातात. बारा वाजल्यानंतर घंटागाडी फिरत नाहीत. तसेच दररोज असे नियोजन असते.’

अशी आहे यंत्रणा
झोनक्रमांक :
प्रभाग :
आरोग्य निरीक्षक :
घंटागाडी : ११
झाडूवाले : १०६
खेपा प्रती घंटागाडी :

^सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात घंटागाडीमार्फत कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. सकाळी तीन आणि दुपारी तीन असे एक घंटागाडी सहा खेपा करते. रेगळ,झोन अधिकारी
^आम्हीदरराेजप्रत्येक प्रभागात घंटागाडी पाठवतो. प्रती घंटागाडी सहा ते सात खेपा होतात. हे काम सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत होते. दुपारनंतर घंटागाडीला काम नसते. विजय कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक

^पाथरुटचौक परिसरात घंटागाडी आठ ते दहा दिवसाला एकदा येते. दररोज सकाळ-संध्याकाळ घंटागाडी येत नाही. तसे नियोजन असते तर सर्वत्र घाण साचली नसती. रामाम्हेत्रे, नागरिक
मौलाली चौक भागातील कचराकुंडीची ही स्थिती आहे. कचरा उचलल्याने दुर्गंधी पसरली आहे.
बातम्या आणखी आहेत...