आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई कामगारांच्या २०० घरांना गळती, इमारत कोसळून जीवितहानीचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील सुमारे दोन हजार मनपा सफाई कर्मचाऱ्यांवर धोकादायक इमारतीत राहण्याची वेळ आली आहे. शासन अनुदानातून घरकुल देणे बंधनकारक असताना महापालिकेने त्यांना घरे देण्यापेक्षा केवळ धोकादायक इमारती सोडा, अशी नोटीस देण्यात धन्यता मानताना दिसत आहे. बुधवार पेठेतील सुमारे ७० घरे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे सुमारे हजार जणांना भयाखाली जगावे लागत आहे. एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयोगाचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी मेहतर समाजाच्या घरकुलांना भेटी देऊन सूचना केल्या. त्यानंतरही महापालिकेने काहीच केले नाही. येथील इमारत कोसळल्यास एकाच वेळी सुमारे १०० जणांना त्याचा गंभीर धोका होऊ शकतो.

गेल्यावर्षी पडली होती इमारत
सफाई कर्मचारी दिनेश बच्चुवार या कर्मचाऱ्याचे घर पडले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पाहणी करून सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने काहीच काम केले नाही. उलट तेथील नागरिकांना नोटीस देऊन आपली जबाबदारी त्यांच्यावर ढकलली. धोकादायक इमारत पडल्यानंतरही पालिकेकडून दखल घेतली जात नाही.

...तर अधिकाऱ्यांवर गुन्हे
बुधवारपेठेत ८५ घरांतील रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे ठाण्यातील घटनेप्रमाणे चार इमारती कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाचे झोन अधिकारी, नगर अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाबाबत सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे लाभार्थींचा आकडा मनपाकडे नाही. सर्व्हे करा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
घराबाबत जाब विचारल्यास महापालिकेत काम करताना त्रास होईल म्हणून धोकादायक इमारतीत राहणारे कर्मचारी थेट बोलण्यास तयार नाहीत.
बजेट नाही म्हणते महापालिका
Ãसफाई कर्मचाऱ्यांचे घरकुल धोकादायक स्थितीत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले. पालकमंत्र्यांनी तेथे भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांना पर्यायी घरकुल दिल्यास तेथील जागा सोडण्यास तयार अाहेत. पावसामुळे घर पडल्यास त्याची जबाबदारी मनपाची असेल.’’ नरसूबाई गदवालकर, नगरसेविका
येथे आहे योजनेसाठी २५ एकर जागा
देगाव जलशुद्धीकरण केंद्रासमोर महापालिकेच्या मालकीची सुमारे २५ एकर जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुल बांधता येऊ शकेल.
अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील
Ãमाझ्या कार्यालयाच्या मागील बाजूस सफाई कर्मचारी वसाहत आहे. तेथील अनेक इमारतींना गळती असून, याबाबत मी महापालिका नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना आणून वस्तुस्थिती दाखवली. घरकुल गळत आहेत. यात दुर्घटना झाल्यास मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे लागेल.’’
आनंदचंदन शिवे, नगरसेवक
हे अडकले लालफितीत
सातरस्ता येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलासाठी आर्किटेक्ट विवेक कोटा यांनी आराखडा तयार केला. त्या जागेचा उतारा नाही. रूपाभवानी मंदिरासमोर ७१ घरकुले बांधण्यात येत असून, ते अर्धवट आहेत. राजेश कुमार मीना नगरातील घरांबाबत तांत्रिक मुद्दा पुढे आला आहे. अन्य ठिकाणीही कर्मचाऱ्यांच्या घरकुलाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी वसाहत
मनपा कर्मचाऱ्यांसाठी तयार वसाहत : सुंदरमनगर, राजेशकुमार मीना नगर, सात रस्ता मनपा कर्मचारी वसाहत, भवानी पेठ
अशी आहे वस्तुस्थिती
चारमुख्य इमारतींना गळती आहे. तिसऱ्या मजल्यावरील घरांत पावसामुळे गळती सुरू आहे. दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर ओलावा जाणवतो. स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. दरवाजे नाहीत. वरील पॅरापीट कधी कोसळेल याची खात्री नाही.
८५ घरे धोकादायक
बुधवारपेठेत राहणाऱ्या मेहतर समाजातील मनपा सफाई कर्मचाऱ्यांसाठी तेथे सुमारे १५० घरकुले आहेत. त्यापैकी ८५ घरकुले धोकादायक अवस्थेत आहेत. त्यातील सुमारे पाच घरांना महापालिकेने धोकादायक असल्याची नोटीस दिली आहे. या कर्मचाऱ्यांची दुसरीकडे घर घेण्याची ऐपत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
थेट प्रश्न
प्रश्न - सफाईकर्मचाऱ्यांचा सर्व्हे झाला का?
उत्तर-नाही.
प्रश्न-बुधवार पेठेतील घरकुले धोकादायक स्थितीत आहेत का?
उत्तर- होय.काही घरे धोकादायक आहेत. त्यांना नोटीस दिली आहे.
प्रश्न- पुढेकाय?
उत्तर- त्यांनातेथून स्थलांतर करावे लागेल.
प्रश्न- तेथीलघरांची दुरुस्ती केली नाही.
उत्तर- काहीइमारतींची केली आहे. इतर इमारतींचीही करू.
मनपाकडून सर्व्हे नाही
महापालिकेच्यासफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलासाठी महापालिकेने कोणताही सर्व्हे केला नाही. सात रस्ता येथील जागेचा वाद आहे. बुधवार पेठेतील सफाई कर्मचाऱ्यांचे घरकुल पडण्याची शक्यता अाहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना तत्काळ घरे बांधून द्यावे.’’
अशोकजानराव, अध्यक्ष,मनपा कर्मचारी संघटना
आपल्या प्रतिक्रिया: तुमच्यानावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा
बातम्या आणखी आहेत...