आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्वा! स्वच्छतेत सोलापूर रेल्वेस्थानक देशात चौथे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाचा स्वच्छतेत देशात चौथ्या क्रमांक आला आहे. तशी माहिती गुरुवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. देशातील प्रमुख महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील स्वच्छता स्थिती जाणून घेण्यासाठी प्रभू यांनी स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत मोहीम राबवली होती. या मोहिमेत तीन महिन्यांपूर्वी ‘आयआरसीटीसी’ने निवडलेल्या सामाजिक संस्थेने सोलापूर स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर संस्थेने सादर केलेल्या अहवालात सोलापूर स्वच्छतेत चौथे ठरले.
देशातील वन दर्जाच्या स्थानकावरील साफ-सफाईची पाहणी झाली. त्रयस्थ संस्थेने केवळ पाहणी करता प्रवाशांशी संवाद साधून माहिती घेतली. स्थानकावरील फलाट, स्वच्छतागृह, वेटिंग रुम, पादचारी पूल, खाद्यपदार्थांचे स्टॉल आदी ठिकाणची स्वच्छतेची पाहणी केली. याचा तपशीलवार अहवाल रेल्वे मंडळाला सादर केला होता.

^स्वच्छतेच्या बाबतीतआपण देशात चाैथ्या क्रमांकावर येणे ही खूप आनंदाची बाब आहे. स्थानकावर स्वच्छता कायम राहावी म्हणून सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात येत होते. रेल्वे प्रवाशांनीदेखील स्थानकावर स्वच्छता राखण्यात मोलाचे योगदान दिले.” आर. के. शर्मा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न
^प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वच्छतेसाठी सर्व स्थानकांना विभागून दिले होते. वरिष्ठ पातळीवरून निरीक्षण ठेवण्यात येत होते. अनेकवेळा काही स्थानकांवर अचानक पाहणी करण्यात येत होती. त्यामुळे स्थानकावर स्वच्छतेसाठी प्रत्येक कर्मचारी प्रयत्न करत होता. ही स्वच्छता कायम राहावी म्हणून देखरेख करण्यात येईल.” मनिंदर सिंग उप्पल, अतिरिक्तविभागीय रेल्वे व्यवस्थापक

सोलापूर मध्य रेल्वे विभागात अव्वल
^सोलापूर संपूर्ण मध्य रेल्वेत स्वच्छतेविषयी पहिल्या क्रमांकावर आहे. आज सोलापूर देशात चौथ्या क्रमांकावर आले. ही खूप आनंदाची बाब आहे. याबाबत विभागाने केलेेले िनयोजन चांगले आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सातत्याने मेहनत घेतली. त्यामुळेच सोलापूर रेल्वे स्थानक देशात चौथ्या क्रमांकावर आले.” दत्ता सुरवसे, सदस्य,विभागीय रेल्वे सल्लागार समिती

सोलापूरकरांसाठी अिभमानास्पद बाब
^सोलापूर स्थानकाची चौथ्या क्रमाकांवर निवड हाेणे हे सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वच्छतेबाबत प्रवाशांनी दाखविलेली जागरुकता आणि रेल्वे प्रशासनाची स्वच्छतेविषयी असलेली तत्परता या दोन गोष्टींमुळे हे साध्य झाले आहे. रेल्वे प्रशासनाने सातत्याने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.” हर्षद मोरे, सदस्य,मध्य रेल्वे सल्लागार समिती
बातम्या आणखी आहेत...