आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी लिपिकाने पत्‍नीस लिहीले पत्र, वाचाल तर अश्रू येतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेत काम करताना गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेले दिनकर दगडू भोसले यांनी आपल्‍यावरील आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना ना प्रशासनाने दाद दिली ना पतसंस्थेच्या संचालकांनी. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन भोसले यांनी आत्‍महत्‍या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्‍या कुटुंबियांसाठी अतिशय भावनिक पत्र लिहून ठेवल्याचे आता समोर आले आहे.
दरम्यान, त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले पतसंस्थेचे चेअरमन जयसिंह मोहिते, सुभाष दळवी, विजय शिंदे व मनोज रेळेकर यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृताच्या पत्नी कल्याणी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. ‘दिनकर हे सुमित्रा पतसंस्थेत लिपीक होते. या पतसंस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचे माझ्या पतीने तीन वर्षपूर्वी पतसंस्थेचे चेअरमन जयसिंह मोहिते व संचालक मंडळाच्या पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले होते. मात्र जानेवारी २०१३ मध्ये मोहिते पाटील, सुभाष दळवी, विजय शिंदे यांनी या गैरव्यवहारास माझ्याच पतीला जबाबदार ठरवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने शेती विकून ८१ लाख रुपये पतसंस्थेत भरले. त्यांनी केवळ ४१ लाख १०० रुपयांची पावती दिली. मात्र यानंतरही संचालकांकडून त्रास सुरुच राहिला. त्यानंतर माझ्या दीराच्या नावे असलेल्या दुमजली इमारतीचा ताबाही घेतला. या त्रासाला कंटाळून मीही अकलुज रुग्णालयाची नोकरी सोडली. आम्ही सहकुटूंब पुण्यात रहायला गेलो. मात्र तिथेही येऊन दमबाजी केली जात होती,’ असे तक्रारीत म्हटले आहे.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दिनकर भोसले यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित संचालकांविरोधात तक्रार दिली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणून १२ जानेवारी रोजी ते पुन्हा आपली कैफियत मांडण्यासाठी दुसऱ्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त दिनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच विष घेतले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर वाचा, दिनकर दगडू भोसले यांनी लिहिलेले संपूर्ण पत्र....