आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंबळी येथे कडकडीत बंद, पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीचा व्यापारी, ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांची प्रशासनाने बदली केल्याच्या निषेधार्थ बेंबळी, करजखेडा (ता. उस्मानाबाद) येथे बुधवारी (दि. १९) व्यापारी, ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पाळला. गावातील प्रमुख मार्गावरून मूकमोर्चा काढून पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच तत्काळ बदली रद्द झाल्यास बेमुदत उपोषण, गावात चूल बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांची प्रशासनाने तडकाफडकी बदली केल्याने बेंबळी, करजखेडा येथे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. सकाळी १० वाजता मूकमोर्चा काढण्यात आला. तसेच बदली रद्द करा, आमचे अधिकारी आम्हाला परत द्या, अशी मागणी करत पोलिस ठाण्यात जोरदार ठिय्या आंदोलन केले. मागणी मान्य केल्यास गुरुवारपासून (दि. २०) गावातील प्रत्येक घरातील चूल बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल. याउपरही प्रशासनाने दखल घेतल्यास शनिवारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात सरपंच बाळासाहेब कणसे, माजी सरपंच मोहन खापरे, व्यंकट मरगणे, ग्रामपंचायत सदस्य सत्तार शेख, सतीश मुंगळे, राजाभाऊ सोनटक्क्े, प्रकाश शेळके, कमलाकर दाणे, माउली निकम, पांडुरंग व्हनसनाळे, बिभीषण माने, पांडुरंग पवार, राजाभाऊ नळेगावकर, श्याम व्हनसनाळे, मनोज हेड्डा, राहुल मुंगळे, अतिश मरगणे, सलमान शेख, सुधीर गायकवाड, विठ्ठल इंगळे, तय्यब जमादार, सादिक शेख, पद्माकर निकम, नंदुतुर्क माने, सलीम शेख आदींसह २०० ग्रामस्थ सहभागी झाले होते.