आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल, पवार, ठाकरेंची व्हाेट बँक दिवाळखोरीत; मोदींची सव्याज परत करणारी: मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- व्हाेटबँक सुरक्षित आणि विकासात्मक दिशेने जाणारी पाहिजे. ती विकास करत व्याजासह परतावा देणारी असावी. एकीकडे पंतप्रधान मोदींची बँक व्याजासह सुरक्षित आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार तर तिसरीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची बँक दिवाळखोरीत िनघाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
आतापर्यंतच्या सरकारला शहरीकरण नको होते. पण आम्ही आव्हान स्वीकारून स्मार्ट सिटी, अमृत योजना आणल्या. सोलापूर शहराच्या शाश्वत विकासासाठी एक हजार कोटी देऊ, तंत्रज्ञानाच्या आधारे विकास करू. नागरिकांना स्मार्ट सुविधा देऊ, असे आश्वासनही दिले. 
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दयानंद आसावा प्रशालेच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या १० यादीत सोलापूरचा समावेश केला. शहर स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न केला. हे पहिल्या पसंतीचे शहर असून, त्यावर पंतप्रधानांचे लक्ष आहे. ४० वर्षे महापालिकेत एकाच पक्षाचे सरकार असताना शहरातील नागरिकांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. जनतेचा विश्वासघात केला. तंत्रज्ञानाचा उर्वरितपान १२ 

वापरकरून पाणीपुरवठा होऊ शकतो. पाणी आहे, पण वितरण व्यवस्थेत त्रुटी आहेत. शहरातील सांडपाणी एनटीपीसीला देऊन, त्यापोटी त्यांची पाइपलाइन शहरासाठी वापरण्याचा प्रयत्न असेल. शहरास अर्धा टीएमसी पाण्याची गरज असताना उजनीतून पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. शहरास बंद पाइपद्वारे पाणी देण्याची गरज आहे. 

अाध्यात्मिक शहर निर्मल हवे 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलापूर जिल्हा दैवतांचा आहे. असे अाध्यात्मिक शहर तीन वर्षांत निर्मल करू. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज आणि कोळसा निर्मिती करण्यात येईल. कचरा वाहतुकीमुळे भ्रष्टाचार होतो. ते थांबवण्याचा प्रयत्न असेल. कंचऱ्याचे डंपिंग बंद झाले पाहिजे. 

तंत्रज्ञानाच्या अाधारे नागरी सुविधा 
शहरात वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे, सोयीयुक्त सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याचा प्रयत्न असेल. नागरिकांना महापालिकेत जाण्याची गरज भासणार नाही. मोबाइल अॅपद्वारे सर्व कामे करता येतील. बस कोठे आहेे, त्यात जागा आहे का? आदी माहिती मोबाइल अॅपद्वारे मिळेल. 

शाश्वत विकासासाठी हजार कोटी 
शहराच्या शाश्वत विकासासाठी हजार कोटी रुपये देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी महापालिकेत एकहाती सत्ता द्या. महापालिका प्रस्ताव तयार करेल, त्यानुसार कामे केली जातील. त्यामुळे वर्षात बदल दिसेल. पाच वर्षांत तुमच्या स्वप्नातील शहर दिसेल. 

गारमेंट पार्क सर्वांना घरे 
सोलापुरात गारमेंट पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे चारपट रोजगार मिळेल. यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. छोट्या उद्योगांसाठी कर्ज मिळत नव्हते. ते आमच्या सरकारच्या काळात मिळू लागले. शहरातील झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सर्वांना घरे देऊ. 

मालक मनपात सत्ता आणा, पाहिजे तितके देतो 
मुख्यमंत्रीम्हणाले की, ‘मालक (विजयकुमार देशमुख) महापालिकेत एक हाती सत्ता आणा. हवी तेवढी घरे देतो. एक हाती सत्ता द्या. विकास करून परिवर्तन दाखवू’, असे म्हणत पालकमंत्र्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली. पाऊण तासाच्या भाषणात शहर विकासावर भर दिला. या वेळी मंचावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोेडे, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, भाजपचे उमा खापरे, रघुनाथ कुलकर्णी, दत्तात्रय गणपा, प्रभाकर जामगुंडेंसह १०२ उमेदवार उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...