आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करात तर जाणारच, पण अजून माेठा पल्ला गाठायचाय ! वीरपत्नी स्वाती महाडिकांचे यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पाेगरवाडी (जि. सातारा) येथील कर्नल संताेष महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांनी लष्करात सेवेची इच्छा संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांच्याकडे व्यक्त केली हाेती. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू केले, मात्र वयाचा अडसर हाेता. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देताना लष्कराने त्यांच्यापुरती ही अट शिथिल करून निमलष्करी दलात भरती हाेण्यासाठी परीक्षेची स्वाती यांना परवानगी दिली. त्यानुसार संपूर्ण तयारीनिशी स्वाती यांनी ही परीक्षा दिली असून त्याच्या निकालाची प्रतीक्षा अाहे. मात्र, यादरम्यान या पुढील वैद्यकीय व शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचणीसाठी त्या बंगळुरूत तयारी करत अाहेत.

जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे १७ नाेव्हेंबर २०१५ राेजी दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. सातारा येथील पोगरवाडीचा हा धाडसी, मनमिळाऊ अधिकारी शहीद झाल्यावर त्याच्या अंत्यदर्शनास संरक्षणमंत्री आले होते. या वेळी वीर पत्नी स्वाती यांनी पतीप्रमाणे अापल्याला व माझ्या मुलांनाही देशसेवेसाठी लष्करात काम करण्याची इच्छा बाेलून दाखवली हाेती. कर्नल संतोष यांनी कुपवाडा भागात माेठे सामाजिक काम उभारले हाेते, त्या वेळी स्वातीही यात सहभागी व्हायच्या. वीरपत्नी स्वाती यांना लष्करात भरती हाेण्यासाठी वयाचा अडथळा येत हाेता. मात्र, सरकारने व लष्कराने वीरपत्नीसाठी हे निकष काहीसे शिथिल केले, मात्र इतरांप्रमाणे मानसिक, बौद्धिक तसेच इतर चाचण्यांत उत्तीर्ण हाेणे त्यांना बंधनकारक अाहेच.

निमलष्करी दलात भरती हाेण्यासाठी नुकतीच स्वाती यांनी लेखी परीक्षा दिली असून त्याचा निकाल दीड ते दाेन महिन्यांनी लागणार अाहे. त्यांची वैद्यकीय चाचणीही घेतली जाणार अाहे. या सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरल्यावरच त्यांना लष्करात नाेकरी दिली जाणार अाहे. गेले सहा महिने त्या परीक्षेची तयारी करत अाहेत. त्यांच्यासाेबतचे इतर अध्यायी त्यांच्यापेक्षा किमान दहा ते बारा वर्षांनी लहान अाहेत. मात्र, त्यांच्या बराेबरीने स्वाती सर्व चाचण्यांत उत्तीर्ण हाेण्यासाठी जिद्दीने तयारी करत अाहेत. स्व. संतोष घोरपडे यांचे मित्रमंडळ, लष्कराचे अधिकारी या अभ्यासाबाबत मदतही करत आहेत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी नातेवाईक, आप्तेष्ट यांचा माेठा पाठिंबा मिळत असल्याचे स्वाती सांगतात.

निवड झाल्याची चर्चा निराधार
स्वाती यांना लष्करात दाखल हाेण्यासाठी लष्कराने व सरकारने वयाेमर्यादेची अट शिथिल केली. इतर सर्व प्रक्रिया मात्र इतर उमेदवारांप्रमाणेच हाेणार अाहेत. त्यांना सर्व परीक्षा, चाचण्याही द्याव्या लागणार अाहेत. लेखी परीक्षेचा अजून निकाल लागलेला नाही. मात्र, त्यांची लष्करात अधिकारीपदी निवड झाल्याच्या वावड्या साेशल मीडियातून उठवल्या जात अाहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या अाहेत. मात्र, जिद्दीच्या जाेरावर स्वाती या सर्व परीक्षा, चाचण्या पूर्ण करून लष्करात दाखल हाेतील, असा विश्वास अाम्हाला वाटताे.
जयवंत घाेरपडे, वीरपत्नी स्वाती यांचे दीर.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्‍वाती आणि शहीद संतोष महाडिक यांचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...