आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॅक्टिकलमध्ये नापास होणे पडणार महागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाविद्यालयीन पदवी अभ्यासक्रमांना सीजीपीए पद्धत लागू करण्यात आल्याने ३० अधिक ७० असा पॅटर्न लागू करण्यात आला आहे. त्यातही ३० गुणांच्या महाविद्यालयीन प्रॅक्टिकल परीक्षेत अनुत्तीर्ण राहिल्यास किंवा यात १२ पेक्षा कमी गुण मिळाल्यास ७० पैकीच्या लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण असतील. पण दुसऱ्या बाजूला ३० गुणांच्या परीक्षेत स्कोअरिंग करणेही सुकर ठरणार आहे.
केवळ अभियांत्रिकी, सायन्ससाठीच असणारी प्रात्यक्षिक परीक्षा कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, सामाजिकशास्त्रे, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासही लागू करण्यात आली आहे. यंदा पदवीच्या प्रथम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना हा पॅटर्न लागू आहे. पुढील वर्षी पदवीच्या तीनही वर्षांसाठी तर पदव्युत्तर दोनही वर्षांसाठी ही पद्धत लागू होईल.
यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास निवड आधारित श्रेयांक प्रणाली (सीबीसीएस) पद्धत लागू आहे. या दाेन्ही पॅटर्न अंतर्गत ३० गुणांचे अंतर्गत मूल्यमापनाचे कामकाज महाविद्यालय स्तरावर करण्यात येते. याचे गुण महाविद्यालय ऑनलाइन पद्धतीने भरते. त्या त्या विषयाची लेखी परीक्षा होण्यापूर्वी हे गुण निश्चित होतात.

पदव्युत्तर प्रात्यक्षिक परीक्षेला दांडी मारल्यास संपूर्ण विषय अनुत्तीर्ण असणार आहे किंवा १२ पेक्षा कमी गुण मिळाल्यासही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण व्हावे लागेल. याचा दुसरा अर्थ लेखी परीक्षेत ७० पैकी ७० गुण मिळविलेला विद्यार्थीही अनुत्तीर्णच असेल.

विद्यापीठाने अंगीकारलेल्या या पद्धतीनुसार अंतर्गत परीक्षांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यापीठ परीक्षा जेवढ्या गांभीर्याने विद्यार्थी घेतात तेवढ्याच गांभीर्याने अंतर्गत मूल्यमापनासही विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल.

उत्तीर्ण होणे अनिवार्य
^पदवी अभ्यासक्रमांतर्गत प्रथम द्वितीय वर्षासाठी सीजीपीए तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास सीबीसीएस पॅटर्न लागू करण्यात आला आहे. दोन्ही पॅटर्नमध्ये ३० गुणांचे प्रात्यक्षिक तर ७० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. पैकी महाविद्यालय स्तरावरील ३० गुणांच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. डॉ.बी. पी. पाटील, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ