आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज उपस्थितीची पडताळणी सुरू, सहसंचालकांसह सात पथकांकडून तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला संलग्नित सर्व म्हणजे ११९ महाविद्यालयांत विद्यार्थी उपस्थिती सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत ही तपासणी मोहीम चालेल. यानंतर या उपस्थितीचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालय पुणे मार्फत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण सहसंचालक एम. एम. देशपांडे यांनी दिली.
प्राध्यापक उच्च शिक्षण संचालक कार्यालयालयातील कर्मचारी अशा सुमारे २१ जणांचे सात पथक तालुका निहाय महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देत आहेत. विषय शाखानिहाय विद्यार्थी उपस्थितींची प्रत्यक्ष माहिती घेत आहेत. याबरोबर संलग्नीत असणाऱ्या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित होते आहे.

अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित अशा तिन्ही प्रकारच्या महाविद्यालयांतून हे सर्वेक्षण सुरू आहे. यातून कोणत्या शाखेला किती विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेले आहेत ही माहिती समोर येण्यास मदत होईल.

विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत असल्याने या काळात महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थिती कमी असते, ही बाब लक्षात घेतली जावी, असे प्राध्यापक संघटनेकडून आवाहन केले गेले आहे.

परीक्षेचा सर्वेक्षणावर परिणाम नाही
परीक्षाकालावधी जवळ आला आहे, २० तारखेपासून विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना प्रारंभ होत आहे, पण याचा परिणाम विद्यार्थी सर्वेक्षणवर पडण्याचे काहीच कारण नाही. ऑक्टोबर महिन्यातील उपस्थितींची आकडेवारी संकलित होत आहे. गरज पडल्यास सप्टेंबरची आकडेवारीही पाहिली जात आहे. देशपांडेएस. एम. , शिक्षण सहसंचालक, सोलापूर

पटपडताळणी नव्हे तर विद्यार्थी संख्या सर्वेक्षण होणार
माध्यमिकप्राथमिक शाळा तपासणी वेळी पटपडताळणी माेहीम सुरू झाली होती. या मोहिमेत अनेक बोगस विद्यार्थी आढळून आले होते.या मोहिमेचा धसका शाळांनी घेतला असला तरी महाविद्यालयीन मोहिमेला मात्र पटपडताळणी शब्द वापरता विद्यार्थी संख्या सर्वेक्षण असा शब्द वापरण्यात आला आहे. या तपासणीत विद्यार्थी संख्या लक्षात घेण्यात येणार आहे.

चार दिवसांची मोहीम
१४ते १७ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार आहे. आतापर्यंत बार्शी, पंढरपूर, सांगोला, साेलापूर शहर, अक्कलकोट या तालुक्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांची तपासणी झाली. यातून सरासरी ७२ ते ८० टक्के विद्यार्थी कॉलेजमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले. उर्वरित तालुक्यात येत्या दोन दिवसांत तपासणी पूर्ण होईल.
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...