आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या हस्ते कम्युनिस्ट देणार कामगारांना 10 हजार घरकुले, 25 ऑक्‍टोबरला भूमिपूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुंभारी परिसरात कष्टकऱ्यांना ३० हजार घरकुले देण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पुढच्या बुधवारी (ता. २५) होत आहे. त्याचे निमंत्रण स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अट घातली, ‘२५ डिसेंबर २०१८ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून १० हजार घरांचे वाटप करायचे.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन येऊ. आहे तयारी?’ प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम झटक्यात म्हणाले, ‘मान्य.’ भाजप आणि माकप यांचे विचार कधीच पटणारे नाहीत. पण कष्टकऱ्यांना स्वमालकीची घरे देण्यासाठी सहकार्य करताहेत. याहून मोठी गोष्ट कोणती? असा प्रश्न श्री. आडम यांनी केला. 
 
भूमिपूजनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. २५ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी पर्यंत होणाऱ्या या सोहळ्यासाठी महामहीम व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह संबंधित खात्यांचे प्रधान सचिव येणार आहेत. सोहळ्याला सुमारे एक लाख लाेकांची उपस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले. या वेळी सीटूचे प्रदेश सचिव अॅड. एम. एच. शेख, नलिनी कलबुर्गी आदी उपस्थित होते. 

अशी आहेत घरे 
१८९एकरांमध्ये ३० हजार घरकुलांची रचना असेल. ३८५ चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांसाठी चारमजले असलेली इमारती बांधण्यात येईल. एका इमारतीत ३२ घरे असतील. किचन, एक बेडरूम, हॉल, संडास आणि बाथरूम असे एका घराचे स्वरूप आहे. संपूर्ण परिसरात केंद्राच्या अमृत योजनेखाली पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव दिलेला आहे, अशी माहिती श्री. आडम यांनी दिली. या घरकुल योजनेचा फायदा हजारो कामगारांना मिळणार आहे. 
 
१४ महिन्यांत १० हजार घरे 
एकाचपरिसरात ३० हजार घरे शक्य आहे का? असा प्रश्न दिल्ली दरबारातील अनेक मातब्बरांनी विचारला. यापूर्वीच १० हजार घरे बांधून कामगारांच्या ताब्यात दिल्याचे दाखले देत हे नवे अाव्हान स्वीकारल्याचे सांगितले. आता फक्त १४ महिन्यांत तब्बल १० हजार घरे उभे करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आधुनिक तंत्र वापरत असून, त्याच्या यंत्रांवरील खर्च आहे, ९० कोटी रुपये. हा निधी उभारण्यासाठी बँकांशी चर्चा सुरू केली. 
बातम्या आणखी आहेत...