आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (एमसीई) ही संस्था सोलापुरातील महापालिकेच्या शाळांना उर्दू इंग्रजी संगणक प्रणाली देणार आहे. याचा लाभ महापालिकेच्या २२ उर्दू शाळांना होणार आहे.

खासगी शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसह तांत्रिक ज्ञानही मिळाले पाहिजे यावर भर देण्यात येतो. त्यामुळे पालकांचा विद्यार्थ्यांना खासगी शाळेत घालण्याचा कल असतो. परंतु महापालिकेच्या शाळेत येणारे हे सामान्य कुटुंबातील असतात. तरी त्यांनाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे संगणक, इंग्रजी ज्ञान असणे गरजेचे आहे, या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यातील एससीई या संस्थेने पाऊल उचलले आहे.

संगणक प्रयोगशाळा तयार करून त्यामध्ये फर्निचर करण्यात येणार आहे. २० संगणक संच इंटरनेट सुविधेसह पुरविण्यात येणार आहे. हा सेट उभारण्यासाठी एमसीई या संस्थेला आठ लाखांचा खर्च येणार आहे. संगणकीय प्रयोगशाळा उभारणी झाल्यानंतर संगणक विषय शिकविण्यासाठी इंग्रजी स्पीकिंग प्रशिक्षणाचे वर्ग घेण्यासाठी संस्थेकडूनच कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना मानधन ही संस्था स्तरावर होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला खर्च होणार नाही. फक्त हा प्रयोगशाळा उभारणी करण्यासाठी शाळेत जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

महापालिकेकडून प्रस्ताव आला
सोलापूर महापालिका शिक्षण मंडळाकडून शाळेत संगणक लॅब इंग्रजी स्पीकिंग कोर्सचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव आला होता. त्यानुसार महिनाभरात कामास सुरुवात करण्यात येणार आहे. प्रत्येक उर्दूच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असून मुलांना याचा लाभ होईल. एका शाळेत सेट उभा करण्यासाठी आठ लाख रुपये खर्च येईल. पी.ए. इनामदार, एमसीई, पुणे

यासाठी शेख यांनी केले प्रयत्न
विविधशाळांमध्ये लर्निंग प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे मनपा शाळामध्ये -लर्निंग अथवा संगणकीय लॅब उभारली जावी यासाठी परिवेक्षक मुमताज शेख यांनी एमसीई संस्थेशी संपर्क करून उर्दू मनपाच्या शाळाही संगणकीय झाल्या पाहिजेत यादृष्टीने प्रयत्न केला. एमसीई या संस्थेची माहिती प्रशासनाधिकारी यांना सांगून संस्थेशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार प्रस्ताव वगैरे प्रक्रिया करून काम मार्गी लावले.

आयुक्तांच्या परवानगीने प्रस्ताव
प्राथमिक शिक्षण विभागाने आयुक्तांची पूर्वपरवानगी घेऊन प्रस्ताव तयार केला. तो पुण्याच्या संस्थेकडे पाठविण्यात आला. त्या संस्थेने गरिबांच्या मुलांची जाण ठेवत आणि महत्त्व लक्षात घेऊन मनपा उर्दूच्या शाळा संगणकीय करण्याचे मान्य केले. सुरुवातीला एका शाळेत लॅब होईल. त्यानंतर इतर शाळांत सुरू येईल.” विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी, महापालिका
बातम्या आणखी आहेत...