आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घरबसल्या संगणक प्रशिक्षण घेणे झाले सोपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आता घरबसल्या संगणकाचे विविध प्रशिक्षण घेणे सहज शक्य होणार आहे. यासाठी विशिष्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मदतीने मुंबईच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला आहे. यातून घरबसल्या ज्ञान मिळणार आहे. तसेच लहान मुलांसाठी असलेल्या क‍िड्स लॅपटॉप, टॅब, ई-बुक्स, एज्युकेशन टॉय यासारख्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंनी त्यांना घरीच शिकवणेही सोपे झाले अाहे.
घरबसल्या संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी अाॅनलाइन नाेंदणी करावी लागणार अाहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र िदले जाणार अाहे. हे प्रशिक्षण अनेक भाषांमध्ये उपलब्ध अाहे. तसेच क‍िड्स लॅपटॉप, टॅब, ई-बुक्स, एज्युकेशन टॉय यासारख्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंनी घरीच शिकवणे सोपे होते आहे. ई-बुकच्या माध्यमातून दोन वर्षांच्या मुलांना रंग, अल्फाबेट नंबर, फळे, भाजीपाला यांची ओळख करणे शक्य होत आहे. एज्युकेशन टॉयमध्ये टॉकिंग टॉम, ई-चार्ट उपलब्ध अाहेत. तर किड्स लॅपटॉपमध्ये मिसिंग लेटर, उच्चारण आहेत. एज्युकेशनल टॅबमध्ये प्राण्यांचे आवाज, कथा, अॅक्शन आदी गोष्टी सहज शिकवल्या जाऊ शकतात.
हे काेर्स आहेत उपलब्ध
स्पोकन ट्यूटोरियल जावा, अॅडव्हान्स सी, लायनेक्स, स्पोकन ट्यूटोरियल टेक्नॉलॉजी, ग्राफिक्स डिझाइन, अॅडव्हान्स सीपीपी, डिजिटल डिव्हाइड आदी. कोर्सेस उपलब्ध आहेत.
गेमही उपलब्ध : लॅपटॉप,टॅबमध्ये इतर गोष्टींसोबत एज्युकेशन गेम्सही उपलब्ध. याचा उपयोग करून खेळातच बौद्धिक पातळी वाढण्याच्या दृष्टीने मुलांना मदत होऊ शकते.
असा करतात वापर
स्पोकन ट्यूटोरियलच्या spoken-tutorial.org या संकेतस्थळावर गेल्यास कोर्ससाठीची भाषा पर्याय समोर दिसतील. जे प्रशिक्षण अापल्याला घ्यायचे अाहे ती भाषा तेथे िनवडावी. त्यानंतर प्रशिक्षणाची चाैकट उघडेल. त्यात काही व्हिडिओ लिंक पीडीएफ फाइल अाहेत. त्या अापल्याला सहज डाऊनलोड करता येतात. त्यानुसार आपले मनपसंत प्रशिक्षण आपण घरीच शिकू शकतो. हे प्रशिक्षण सर्वच भाषेत उपलब्ध आहे.