आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूरकर यांनी दिल्या प्रार्थनाला शुभेच्छा, माजी गृहमंत्र्यांनी बार्शीत घेतली प्रभाताई झाडबुकेंची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने घेतलेली झेप कौतुकास्पद अाहे. तिच्या या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांनी काढले.
पुण्याजवळील रांझणी येथून लातूरकडे सहकुटुंब परतत असताना प्रार्थनाच्या रिओ आॅलिम्पिकमधील सहभागाबाबत तिचे अभिनंदन करण्यासाठी ते बार्शीला थांबले होते. माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे झाडबुके परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांच्यासमवेत त्यांचा मुलगा शैलेश, स्रुषा तसेच नात उपस्थित होती.

प्रारंभी पाटील यांना प्रार्थनाच्या कारकिर्दीविषयीचा संजय श्रीधर यांनी तयार केलेला माहितीपट पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दाखविण्यात आला. प्रार्थना सध्या सरावानिमित्ताने हैदराबादला असल्याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून श्री. पाटील यांनी प्रार्थना सानिया या महिला दुहेरीमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या जोडीस रिओ आॅलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या. वडील गुलाबराव आई वर्षा ठोंबरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

यावेळी श्रीधर कांबळे, सचिन झाडबुके आदी उपस्थित होते. बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा बार्शीचे माजी नगराध्यक्ष कै. भाऊसाहेब झाडबुके यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी जानेवारी १९९७ मध्ये ते बार्शीला आले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर पाटील बार्शीला आले होते.
बातम्या आणखी आहेत...