आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची गोडीगुलाबी, राष्ट्रवादीत कागाळ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपचे मंत्री जनहिताऐवजी स्व:हित जोपासत आहेत. मोदी आणि फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली. जनतेला याची जाणीव झाली असून ‘एक भूूल कमल फूल’ अशी भावना तयार झाली आहे. चार प्रभागांची रचना ही भाजपाला अंगलट येणार आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला करून एकदिलाने काम केल्यास यश तुमचेच आहे, असे मत कॉंग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने बुधवारी जुळे सोलापूर येथील गोविंदश्री मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात अाली. या वेळी ते बोलत होते. निवडणूक कोणतीही असो, कॉँग्रेसचा पराभव काँगर्ेसच करते. स्टेजवर यायचे, भाषणे ठाेकायची अन् पोखरायचे ही वृत्ती बदलायला हवी. अशा वृत्तीमुळे स्वत:ही संपाल आणि पक्षालाही संपवाल, असे परखड मत महापौर सुशीलाआबुटे यांनी व्यक्त केले. कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गाफील राहिल्यामुळे पक्षाचा पराभव झाला. आता पेटून उठा भाजपाचा बुरखा फाडून टाका, असे मत प्रकाश यलगुलवार यांनी अावाहन केले. या वेळी नगरसेवक शिवलिंग कांबळे, मधुकर आठवले, बाबा मिस्त्री, परवीन इनामदार, इस्माईल शेख, शैलजा राठोड, इंदुमती अलगोंडा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवक शहराध्यक्षांना केले कार्यमुक्त
सोलापूर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विनायक विटकर हे प्रदेश निरीक्षकांनी आयोजित मेळाव्यास आणि बैठकीला अनुपस्थित राहिले. याआधी शहराध्यक्षांविरोधात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशपातळीवर अनेक तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश निरीक्षक सूरज चव्हाण यांनी युवक शहराध्यक्ष विटकर यांना कार्यमुक्त केल्याचे आणि येत्या १० दिवसांत नवीन शहराध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे जाहीर केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीत निरीक्षक चव्हाण यांनी युवकचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून कोणतीच तयार नसल्याची व्यथा मांडली. शहराध्यक्ष कोणत्याही घटनेत लक्ष घालत नाहीत. ते स्वत: एकाही कार्यक्रमास येत नाहीत असे म्हणणे बैठकीत मांडले. याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना सादर करणार असे चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवककडून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी युवक संघटनेच्या ताकदीची गरज आहे. येत्या काळात आपणास तीव्र प्रखर आंदोलने छेडावी लागणार असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. बैठकीस प्रदेश सचिव प्रशांत बाबर, युवराज राठोड, अक्षय बचुटे, नवनाथ भजनावळे, गुब्याडकर उपस्थित होते.

लवकरच मेळावा
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवककडून ऑगस्टअखेरपर्यंत युवक मेळाव्याचे नियोजन आहे. मेळाव्यास पक्षाचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांची उपस्थिती असेल. मेळाव्याचे ठिकाण, तारीख याबाबत प्रदेशपातळीवरून निर्णय होईल.

समाजसेवा सुरूच : माने
दिलीप माने म्हणाले की, बाहेरच्यांना आपण खंबीर आहोत, पण आपलेच आपल्याला महागात पडतात. राजकारणात यश-अपयश होतच असते. विधानसभेत पराभव झाला तरी मी समाजसेवा बंद केली नाही. नागरिकांच्या मदतीला धावून जावा, असा सल्ला देत शहराध्यक्ष खरटमल यांनी पक्ष कार्यालयात उद्याच मीडिया सेल सुरू करण्याचे जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...