आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाषा मिळून लढण्याची अन् तयारी सुरू आहे स्वबळाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत आहेत तसे प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करू लागला आहे. आघाडी किंवा युती करून रिंगणात उतरायचे की स्वबळावर निवडणूक लढवायची याबद्दल ठोस निर्णय सांगण्याच्या मनस्थितीत कोणताच पक्ष दिसत नाही. युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल, असे भाजपने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांॅग्रेससोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केले. भाषा मिळून लढण्याची असली तरी प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

श्री. चव्हाण म्हणाले, मागील वेळी मनपा आणि जि.प. निवडणुकीत आघाडी झाली नव्हती. यावेळी आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील. त्यात प्रदेश हस्तक्षेप करणार नाही. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीस लागावे. ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
प्रणितीयांच्या नेतृत्वाखाली : नुकतेचकाँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माकपचे नगरसेवक माशप्पा विटे यांनी महापालिकेत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकेल, असे सांगत सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांचे कौतुक केले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढवल्या जातील, असे माजी आमदार प्रकाश युलगुलवार यांनी सांगितले. यावेळी धर्मा भोसले, विश्वनाथ चाकोते यांनी मनोगत व्यक्त केले.

आताजबरदस्त लढाई : मागीलमहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माझ्यावर हल्ला झाला. आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार सोलापुरात प्रचारासाठी आले. तरीही त्यांच्या केवळ तीन जागा वाढल्या. निवडणुकीनंतर आघाडी करावी लागली. आता जबरदस्त लढाई लढावी लागेल, असे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

त्यांनी राग व्यक्त केला : विधानपरिषदनिवडणुकीच्या वेळी काँग्रेस नगरसेवकांची मते फुटल्याबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावर श्री. चव्हाण म्हणाले, स्थानिक नगरसेवकांना राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको होती. त्यामुळे त्यांनी राग व्यक्त केला.

बंद खोलीत नगरसेवकांची बैठक
श्री.चव्हाण यांनी नगरसेवकांची बंद खोलीत बैठक घेऊन मनपा निवडणुकीबाबत सूचना दिल्या. यावेळी आमदार मधुकर चव्हाण, प्रणिती शिंदे, भारत भालके, सिद्धाराम म्हेत्रे, रामहरी रूपनवर, महापौर सुशीला आबुटे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, धर्मण्णा सादूल, निर्मला ठोकळ आदी उपस्थित होते.

२०१४ सारखे पुन्हा नकाे : प्रणिती
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आतापासून प्रचार सुरू करा. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी आम्ही सहज घेतले. तसे पुन्हा होऊ नये. मोदी सरकार काही चुका करत आहे. त्याचे भांडवल करता येईल. आज व्यापारी आणि कामगार खुश नाही. अब की बार पाकीटमार अशी या सरकारची स्थिती आहे.
बातम्या आणखी आहेत...