आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात बुलडाण्यात काँग्रेसची निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- पेट्रोल-डिझेलच्या भावात ३१ मे रोजी रात्री केलीली दरवाढ सेवाकर तसेच विनाअनुदानित सिलेंडरच्या दरवाढीचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले आहे.

अांदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५५ टक्क्यांनी घसरल्या असतानाही पेट्राेल डिझेलचे दर कमी का होत नाही. रेल्वे प्रवास, वैद्यकीय तपासणी, विमा, मोबाइल बिल, शिवनेरी अन्य वातानुकूलित बसचा प्रवास, सिनेेेमाची तिकीटे, बँकिंग, हॉटेल आदी सेवा महागणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

शेतकऱ्यांच्या नावाखाली सेवाकरात कृषी कल्याण अधिभार लादण्याचा सरकारला नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने केलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या वेळी आंदोलनात सरकारविराेधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा अलका खंडारे, हाजी दादूसेठ, बांधकाम सभापती अंकुश वाघ, समाज कल्याण सभापती गणेश बस्सी, समाधान हेलोडे, दीपक रिंढे, राजीव काटीकर, सुनील सपकाळ, पुरुषोत्तम देवकर, मनोज कायंदे, विनोद चिंचोले, श्लोकानंद डांगे, गाैतम मोरे, ज्योत्स्ना जाधव, मन्सुर खान, सुरेश सरकटे, संध्या इंगळे, अॅड. राज शेख, सतीश मेहेंद्रे, मोईन काझी, जयश्री शेळके, बंडू काळवाघे, मीनल आंबेकर, सतीशचंद्र रोठे, विनोद बेंडवाल यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...