आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा शिक्षण मंडळ सभापतिपदावरून काँग्रेस अाघाडीत रस्सीखेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षणमंडळ सभापतिपद मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अाज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. मात्र काँग्रेसने हे पद सोडण्यास नकार देऊन शिक्षण मंडळाच्या बदल्यातच परिवहनचे सभापतिपद देण्यात अाल्याने कोणते तरी एक पद घ्या, एक सोडा अशी भूमिका काँग्रेसने मांडली अाहे. तर शिक्षण मंडळ मिळावेच म्हणून शेवटपर्यंत राष्ट्रवादीने अाग्रह कायम ठेवला अाहे.

शिक्षण मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य अाहेत, त्या पैकी अरुणा वर्मा या सिनियर कार्यकर्त्या अाहेत. त्यामुळे त्यांना हे सभापतिपद मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू अाहेत. पण पक्षाकडून अजून कोणाचेच नाव नक्की केलेले नाही. परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीने सभापतिपद मिळविले. त्यामुळे काँग्रेसने अाता शिक्षण मंडळ सभापतिपद द्यायचे नाही, असा ठाम निर्णय घेतला अाहे. तर झालेल्या कराराप्रमाणे हे पद मिळावे असा अाग्रह राष्ट्रवादीने धरला अाहे. ठरलेल्या कराराप्रमाणे सभापतिपदे दिली अाहेत, अाता अाणखी देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने अाज मांडली. दोन पक्षातील हा वाद चालू असताना सभापतिपद अापल्याला मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरू झाले अाहेत.
राष्ट्रवादीतून अरुणा वर्मा यांनी काहीही झाले तरी हे पद मिळालेच पाहिजे, असा अट्टाहास चालविला अाहे. किती वर्षे नुसते कार्यकर्ते म्हणून राहायचे, असा सवाल त्या अाता करीत अाहेत. तर काँग्रेसमध्येही हीच री अोढली जात अाहे. संकेत पिसे यांना जोरदार विरोध करीत काँग्रेसच्या काही जणांनी एकत्र येऊन श्रेष्ठींना लेखी पत्रच दिले अाहे. यावरून काँग्रेसमधून धुसफूस सुरू झाली अाहे. सभापतिपदावरून वेगवेगळे प्रस्तावही काँग्रेससमोर येऊ लागले अाहेत. सभापतिपदावरून दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू अाहे. रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे, पद्माकर काळे यांच्यासह एका शिष्टमंडळाने सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादीचा प्रस्ताव एेकल्यानंतर शिंदे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केली. त्यातून हे पद राष्ट्रवादीला पद सोडता येणार नाही, असे ठरल्याची चर्चा रंगली अाहे.

शिंदे यांचा नकार
शिक्षणमंडळ सभापती पदाच्या मागणीकरीता आमचे शिष्यमंडळ माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे गेले होते. मात्र परिवहन राष्ट्रवादीला दिल्यामुळे शिक्षण मंडळ देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. भारत जाधव, शहराध्यक्ष,राष्ट्रवादी
बातम्या आणखी आहेत...