आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेव्हा धोका झाला, राष्ट्रवादीशी युती नको रे बाबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून काॅँग्रेसला धोका झाला आहे. त्यासाठी यंदा आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षासोबत युती नको, अशी मागणी काॅँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर केली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस भवन येथे नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक फ्रंटल अध्यक्ष, कॉँग्रेस पदाधिकारी आदींची बैठक बोलावली होती. बैठकीत ही मागणी करण्यात आली. व्यासपीठावर शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महापौर सुशीला आबुटे, धर्मा भोसले, निर्मलाताई ठोकळ, धर्मण्णा सादूल, राहुल गायकवाड, कुमूद अंकाराम, जगदेवी नवले, सुजाता आकेन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन नावे मतदार यादीत नोंदवून घ्या : नगरसेवक,नगरसेविका, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार अणि मतदार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात नाव नोंदणी करावी. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक मतदारांची नोंदणी करणे आपले कर्तव्य आहे. युवक विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी रविवारी १८ सप्टेंबर रोजी आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर निवडणूक कार्यालयामार्फत मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचा कार्यकर्त्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीस अल्पसंख्याक अध्यक्ष तौफिक हत्तुरे, सेवादलचे अध्यक्ष अशोक कलशेट्टी, महिला बाल कल्याण समिती सभापती सारिका सुरवसे, माजी महापौर अलका राठोड, नगरसेवक शिवा बाटलीवाला, मधुकर आठवले, अनिल पल्ली, दत्तू बंदपट्टे, उदय चाकोते, अविनाश बनसोडे, कल्पना यादव, जगदेवी नवले, सरस्वती कासलोलकर, मंदाकिनी तोडकरी, अश्विनी जाधव, विनोद गायकवाड, शैलजा राठोड, वेदमती ताकमोगे, परवीन इनामदार, फिरदोस पटेल आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपावर पुन:श्च कॉँग्रेसचा झेंडा
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा. नवनवीन कार्यकर्त्यांना कॉँग्रेसच्या प्रवाहात आणा. आगामी महापालिका निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून महापालिकेवर पुन:श्च कॉँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन शहराध्यक्ष खरटमल यांनी यावेळी केले.
बातम्या आणखी आहेत...