आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाघाडी होवो न होवो, काँग्रेस लढणारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अाघाडी होवो होवो काँग्रेस पक्षच लढवणार अाहे, असा दावा जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. दरम्यान, काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली अाहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसकडे मतदारांचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त अाहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसनेच लढवली पाहिजे, असा सूर व्यक्त केला जात अाहे. जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी ही निवडणूक काँग्रेसच लढवेल असा दावा करीत उमेदवार कोण हे श्रेष्ठीच ठरवतील असे सांगितले. दरम्यान, ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली अाहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान अामदार दीपक साळुंखे यांच्याबरोबरच माजी अामदार दिलीप माने, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पाटील, प्रदेश सचिव सुधीर खरटमल, पंढरपूरचे कल्याणराव काळे, मोहोळचे माजी अामदार राजन पाटील यांचीही नावे पुढे अाली अाहेत. राष्ट्रवादीतून महायुतीकडे गेलेले संजय शिंदेही चाचपणी करू लागले अाहेत. राज्यातील एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतले चित्र समोर ठेवून अाघाडीने निवडणूक लढवण्याचे ठरले तर सोलापूर कोणाच्या वाट्याला येणार, यावरच उमेदवारीचे पुढचे गणित अवलंबून अाहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अाणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या चर्चेतून कोण लढणार अाणि उमेदवार कोण हे स्पष्ट होणार अाहे. काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार कोकणातून नारायण राणे, पश्चिम महाराष्ट्रातून हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्यांना विधान परिषदेत पाठवण्याचा विचार सुरू अाहे. त्यामुळे सोलापुरातून स्थानिक उमेदवारच राहणार की दुसऱ्याच कोणाचे नाव समोर याबाबतची उत्सुकता अाहे.

दीपक साळुंखे यांचे दुसऱ्या टर्मसाठी प्रयत्न सुरू
विद्यमान अामदार दीपक साळुंखे यांनी दुसऱ्यांदा संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस नेत्यांबरोबरही त्यांनी सूत जमविले अाहे. अक्कलकोटचे अामदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भूमिका त्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार अाहे. तर इकडे काँग्रेसकडून दिलीप माने यांनी उमेदवारीसाठी थेट दिल्ली गाठण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे पक्षातील सूत्राकडून सांगितले जात अाहे.