आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची वाचा बसली, या तालुक्यांनी केल्या मागण्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- दुष्काळासंदर्भातउपाययोजना करण्याबाबत फडणवीस सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची वाचा बसली आहे, अशी घणाघाती टीका जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण कापसे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजी मांगडे, विलास रेणके, अब्बास शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, जिल्हा परिषद आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, युवराज काटे, मनीष चौहान, सुशांत चव्हाण, अॅड. विकास जाधव आदी उपस्थित होते. प्रभारी नायब तहसीलदार अप्पा कलढोणे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी फडणवीस सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आमदार दिलीप सोपल यांची मात्र या आंदोलनास अनुपस्थिती जाणवली.
‘पंधरादिवसांत पाणी सोडा’
मोहोळयेत्यापंधरा दिवसांत उजनी धरणातील पाणी सोडावे, चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा शेतकऱ्याची संपत्ती असणारी जनावरे सरकारी कार्यालयात आणून बांधण्याचा इशारा माजी आमदार राजन पाटील यांनी दिला.
माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, दूध संघाचे उपाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, विद्यार्थी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मानाजी माने, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य कुंदन धोत्रे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर लांडे, कौशिक गायकवाड, कल्पना खंदारे, यशोदा कांबळे आदी उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांनीतयारी ठेवावी’
पंढरपूरमागण्यापदरात पाडून घेण्यासाठी फक्त मोर्चे काढून चालणार नाही तर कायमस्वरूपी रस्त्यावर उतरून हिसकावून घेण्याची तयारी शेतकऱ्यांना ठेवावी लागणार
आहे. असे मत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.

काँग्रेसच्या मोर्चात आमदार भारत भालके यांचीच उपस्थित नसल्यामुळे भालके-काळे यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी प्रांताधिकारी संजय तेली यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदारहोणे हा नशिबाचा भाग : कल्याणराव काळे
कसल्याहीप्रकारच्या राजकारणासाठी हा मोर्चा काढलेला नाही. आमदार होणे हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. कल्याण काळे यांनी आपली ताकद दाखविण्यासाठी हा मोर्चा काढला नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी मोर्चा काढला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांचा कालावधी लक्षात घेतला तर काँग्रेसचे सरकार असो किंवा विरोधकांचे, ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळी कल्याणराव काळे शेतकऱ्यांच्या बाजूने होते, असे काळे म्हणाले. सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपुरात काढलेल्या मोर्चाला प्रतिसाद मिळाला.
पंढरपूर : मोर्चाचेनेतृत्व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी करायला हवे होते. मात्र त्यांनी पाठ फिरवली. पण हेच आमदार भालके हे त्यांच्या मतदार संघात नसलेल्या भोसे (ता. पंढरपूर) येथील उजनीच्याच पाण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांनी केलेल्या आंदोलनास आवर्जुन उपस्थित राहिले.

बार्शी : जनावरांसाठीतालुक्यात चारा छावण्या चालू कराव्यात, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे थकित कर्जाचे व्याज माफ करून कर्जाचे पुनर्गठन करावे, रोजगार हमी योजनाची कामे तत्काळ सुरू करावीत, पावसाअभावी खरीप पिके वाया गेल्याने शासनाने नुकसानभरपाई द्यावी. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करावेत.

मोहोळ : डाव्याउजव्या कालव्यातून पाणी सोडावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्यावेत, धनगर आरक्षण मिळावे, दुधाला दर मिळावा, अाष्टी, शिरापूर या योजनांसाठी उर्वरित निधी मिळावा, चारा छावण्या सुरू कराव्यात या मागण्यांचे निवेदन तहसीलदार बी. आर. माळी यांना देण्यात आले.