आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांधकाम खाते गोंधळलेले, सर्व्हिस रोडचेही नाही गांभीर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जीवघेण्या ठरलेल्या सोलापूर- विजापूर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याच्या कामात बांधकाम विभाग पूर्णपणे गोंधळल्याचे चित्र शुक्रवारी पुन्हा समोर अाले. बुधवारी केलेल्या गतिरोधकमधील अंतर जास्त असल्याने वाहन नेणे कठीण झाले होते, शुक्रवारी त्याठिकाणी अाता गॅप भरून काढत पॅच भरण्याचे काम केले गेले. या रोडवर सर्व्हिस रोड करण्याबाबत मात्र गांभीर्य दिसत नाही. त्याबाबत उडवा-उडवी केली जात अाहे.
हा महामार्ग करत असताना सर्व्हिस रोडसाठी जागा सोडण्यात अाली. पण ते काम झाले नाही. त्यामुळे या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचा विषय बांधकाम खात्याच्या फाईलीतच राहिला. या रस्त्यावर मास्टरप्लॅन होऊन अाता जवळपास २० वर्षे होऊन गेली. अतिक्रमण काढून सर्व्हिस रोड करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने आजवर काहीच हालचाल केली नाही. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढून टीका सुरू झाल्यावर विभागाला जाग आली. घाई गडबडीत गतिरोधक बनवून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पाठपुरावाकरण्याची गरज
केंद्रसरकारने देशभरात रस्त्यांचा विकास करण्याला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर विजापूर महामार्गावर तातडीने सर्व्हिस रोड तयार होईल यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. या मार्गावर दुचाकी आणि हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. सर्व्हिस रोडची सुविधा झाल्यास मुख्य मार्गावरून दुचाकी जाणार नाही. परिणामी अपघात होण्याचा प्रश्नच येत नाही.

उड्डाणपुलाच्याअाशेवर अधिकारी
सर्व्हिसरस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली. लवकरच उड्डाणपूल होणार आहेत. त्या अंतर्गत विकास आराखडा तयार केला जात आहे. यातून सर्व्हिस रस्ता तयार केला जाईल, असे सांगण्यात आले. परवा हेच अधिकारी सर्व्हिस रस्त्याची गरज नसल्याचे सांगत होते. उड्डाणपूल होण्यासाठी किती वर्षे लागतील हे स्पष्ट नाही. त्यामुळे त्वरेने सर्व्हिस रस्ता बनणे गरजेचे आहे. यासाठी विजापूर रोडवरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे उठवावी लागतील.

गतीरोधक पाहिजेच, नियमही पाळा
^विजापूर रोडवर अपघात मालिका झाल्यानंतर गतिरोधक तयार करण्यात अाले अाहे, हे ठीक अाहे. मुख्य रस्त्यासोबतच सर्व्हिस रोडही पाहिजे. भरधाव वेगाने जाणा-या वाहनांना चाप लावण्याची गरज अाहे. मुख्य रस्त्यावर येताना मुख्य रस्त्यावरील वाहनांना अडचण येणार नाही असे वाहन चालविले पाहिजे. तरच अपघात कमी होतील. जोतिबाजाधव, नागरिक

सर्व्हिस रस्ता करणार
^पूर्वीवस्ती नव्हती आणि लोकसंख्याही अधिक नव्हती. तसेच पुरेसा निधी नव्हता म्हणून सर्व्हिस रस्ता केला नाही. आता उड्डाणपुलाच्या कामाचा आराखडा तयार केला जात आहे. त्याअंतर्गत सर्व्हिस रस्ता होईल. अशोकभोसले, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
अशास्त्रीय पद्धतीने बनवलेले गतिरोधक हे उपाय ठरता अपाय ठरल्याने दुसऱ्याच दिवशी एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो कोमात गेला. त्यानंतर सारवासारव करत राष्ट्रीय महामार्ग विभागाने शुक्रवारी गतिरोधकांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व्हिस रोडसाठीच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून तातडीने सर्व्हिस रस्ता करण्याचा विचार अद्यापही विभागाच्या ध्यानात आलेला नाही. उड्डाणपूल कामाअंतर्गत सर्व्हिस रस्ता करण्यात येईल, असे सांगत राष्ट्रीय महामार्ग विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. उड्डाणपूल प्रत्यक्षात येईपर्यंत असेच बळी जाणार काय, असा प्रश्न आहे.
बातम्या आणखी आहेत...