आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy In NCP In Solapur Municipal Corporation

गटनेता निवडीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, दिलीप कोल्हे यांनी घेतली अजित पवार यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका राष्ट्रवादी गटनेता निवडीचा वाद मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पोहोचला आहे. गटनेता पदासाठी पद्माकर काळे यांची नियुक्ती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केली. त्याविरोधात नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी प्रदेश नेत्यांकडे तक्रार केली. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

प्रदेशास विचारता निवड कशी केली असा जाब विचारत शहराध्यक्ष जाधव यांना पवारांनी सुनावले. पुढील आठवड्यात सोलापुरात आल्यावर या विषयी चर्चा करू, असे सांगत तूर्त काळे यांना पदावर राहू द्या असा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी श्री. जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सविस्तर बोलण्यास नकार दिला.

महापालिका गटनेता निवड प्रदेश नेत्यांची मान्यता घेऊन का केली नाही, असा जाब शहराध्यक्ष जाधव यांना विचारला. त्यावर जाधव यांनी सारवासारव करत माझ्याकडे वेळ नव्हता. माझ्याशी कोल्हे हे ज्या पद्धतीने वागले ते पक्षाला शोभणारे नव्हते. त्यामुळे मी ही निवड केली, असे जाधव म्हणाले.

कोल्हे यांनी नगरसेवकांना नेले
शहराध्यक्ष जाधव यांनी केलेल्या निवडीस विरोध करण्यासाठी कोल्हे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकांना मुंबईत नेले. त्यात नगरसेवक पीरअहमद शेख, सुनीता रोटे, बिसमिल्ला शिकलगार, गीता मामड्याल, हारून सय्यद यांचा समावेश होता. शहराध्यक्ष जाधव यांच्या बाजूने प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, परिवहन समिती सभापती राजन जाधव आहेत.

पुढील महिन्यात सोलापूर दौरा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुढील महिन्यात सोलापूर दौरा करणार आहेत. या दौऱ्यात गटनेता निवडीसह शहराच्या अन्य विषयांवर चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले.