आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिवांच्या मध्यस्थीनंतर पालकमंत्र्यांनी केली सही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मी सुचविलेली विकासकामे नियोजन आराखड्यात का घेतली नाहीत ? यावरून अंतिम नियोजन आराखड्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सहीच केली नव्हती. ही बाब पुणे येथील बैठकीत उघड झाली. यावर शुक्रवारी नियोजन विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या साक्षीने अंतिम नियोजन आराखड्यावर सही केली आणि जिल्ह्याच्या विकासाला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा केला. पालकमंत्री यांनी पोरवाल यांच्या आश्वासनानंतर सही केली असली तरी अंतर्गत वाद मिटणार का ? हे पाहावे लागणार आहे.
पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यातील वाद प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मिटला, असा संदेश जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत गेला, मात्र पुन्हा पुणे येथील बैठकीत पालकमंत्री देशमुख यांनी सही केल्याने हा वाद मिटला नसल्याचे समोर आले. नियोजन आराखड्यावर सही करण्यासंबंधी नियोजन विभागाचे सचिव पोरवाल यांनी पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांसंबंधी बैठकीत चर्चा करणार असल्याचे सांगत सही करण्याची विनंती केली.
शुक्रवारी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पालकमंत्री यांची वेळ घेतली. पालकमंत्री सोलापूरच्या बाहेर असल्याने सायंकाळी वाजता सही करणार असल्याचा िनरोप आला. त्यानुसार सायंकाळी पावणे सात वाजताच जिल्हाधिकारी मुंढे यांनी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह गाठले. पालकमंत्री यांचे वाजता विश्रामगृहावर आगमन झाले, पुष्कराज सुटमध्ये जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर पालकमंत्री यांनी नियोजन आराखड्यावर सही केली.
पालकमंत्र्यांचायू टर्न
पालकमंत्रीजिल्हाधिकारी यांच्यामध्ये गेल्या दीड वर्षापासून वाद सुरू आहे. यावर पालकमंत्री यांनाच माघार घ्यावी लागली. मागील वर्षी सिद्धेश्वर यात्रेवरून सुरू झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. यंदाच्या वर्षीही सिद्धेश्वर यात्रेवरून वाद निर्माण झाला. जिल्हाधिकारी यांच्या विरोधात पालकमंत्री स्वत: मोर्चामध्ये सहभागी झाले, शिवाय जेलभरो आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना नागपूर येथील अधिवेशनामध्ये उत्तर द्यावे लागले. यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी टोकाची भूमिका घेत जिल्हाधिकारी यांची बदली झाल्यानंतरच नियोजन समितीची बैठक घेणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले. मात्र पालकमंत्री यांना मुंढे यांच्यासोबत बैठक घ्यावी लागली होती.

जिल्हाधिकारी यांनी नियोजन आराखड्यात पालकमंत्री देशमुख यांनी सुचविलेली कामे घेतल्याने सही केलीच नव्हती. यामुळे पुणे येथील बैठकीत हा आराखड्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. शुक्रवारी नियोजन विभागाचे सचिव पोरवाल यांनी एका जिल्ह्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प थांबू शकतो, आपल्या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी मी बोलताे, नाशिक विभागाच्या बैठकीवेळी सोलापूरचा नियोजन आराखडा आपल्या मागण्याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे पोरवाल यांनी सांगितले. यामुळे मी नियोजन आराखड्यावर सही केल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

दुष्काळावर केली चर्चा
नियोजनआराखड्यावर सही करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री जिल्हाधिकारी यांची शासकीय विश्रामगृहावर अर्धा तास चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील दुष्काळ, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि टँकर यावर लक्ष देण्याची सूचना केली. शिवाय नदीकाठावरील गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्यासंबंधी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रथमच पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी मुंढे यांना दुष्काळाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याची सूचना केली.