आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चाच्या मागण्यांवर नेत्यांचा चर्चेस नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठा समाजाच्या मूक मोर्चातील मागण्याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी समाजातील नेत्यांची बैठक घेतली. मात्र, नेत्यांनी चर्चेस नकार देत मोर्चातील निवेदनातील मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असे सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, मागण्या सूचना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून सूचना अाल्या नाहीत. निवेदन मिळाले अाहे. ते मुख्यमंत्र्यांना सोमवारी औरंगाबाद येथे देणार आहे. काही असो भावना तीव्र असल्याचे मला जाणवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या मागण्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या अाहेत. त्यानुसार त्यांनी काल सांगलीत संवाद साधला. कोल्हापूर, सातारा येथूनही माहिती जाणून घेतल्याचे देशमुख म्हणाले.

समाजातील नेत्यांनी मागण्यांबाबत चर्चा करण्यास नकार दिला. मोर्चावेळी निवेदन दिले होते. त्यात मागण्या आहेत. त्याच पोहोचवा, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

- सरकार सकारात्मक, अॅट्राॅसिटी कायद्याबद्दल निर्णय केंद्रस्तरावर अाहे.
- केंद्राला दुरुस्ती शिफारस कळवण्याचे काम सुरू, दुरुपयोग रोखण्याचे प्रयत्न
- अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळा -तर्फे प्रशिक्षण, अर्थसाह्य
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याचा राज्य सरकारचा मानस
- शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन फेब्रुवारीच्या अात
- राज्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्याचा सरकारचा विचार
- अडचणीतील साखर कारखान्यांना अार्थिक मदत देण्याबाबत िवचार सुरू
डाक बंगल्यात निषेधाच्या घोषणा
मराठासमाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे देण्यात अाले अाहे. पुन्हा अाज बैठक घेऊन काय संवाद साधणार अाहेत? मुख्यमंत्र्यांचा हा वेळकाढूपणा अाहे, असे सांगत राम जाधव, सुहास कदम, कुलदीप काळे, किरण क्षीरसागर, केदार गायकवाड यांनी फलक फडकवून निषेधाच्या घोषणा दिल्या. पुन्हा बैठका घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू अाहे. मूक मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर अाता पुन्हा बैठकांची काय गरज असे जाधव म्हणाले. शासकीय विश्रामगृहात निषेधाच्या घोषणा देण्यात अाल्या. हा प्रकार बैठक चालू असताना घडला.
बातम्या आणखी आहेत...