आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवदारे हेच राजकीय ‘लक्ष्य’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक आणि स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीच्या निवडणुका ऑगस्टमध्ये होत आहेत. या दोन्ही संस्थांवर पकड असणा-या राजशेखर शिवदारे यांना हलवण्यासाठी दोन माजी आमदार आतापासूनच मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद मिळवून दिलीप माने यांनी शिवदारेंना राजकीय धक्का दिला. मानेंच्याच मदतीने माजी आमदार विश्वनाथ चाकोते आता बँकेच्या निवडणुकीत उतरतील, असा अंदाज आहे.

बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांचे काम शुक्रवारपासून सुरू झाले. महिनाअखेरपर्यंत मतदार याद्या अंतिम होतील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेच वळसंगच्या स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीची निवडणूक लागेल. या दोन्ही संस्थांवर शिवदारे यांचेच वर्चस्व आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवरही त्यांचे वर्चस्व होते. परंतु त्यांना माजी आमदार दिलीप माने यांनी जोरदार धक्का देऊन बाजार समितीच्या सभापतिपदावर जाऊन बसले. ही राजकीय धग अजूनही शांत झालेली नाही. कारण माजी आमदार चाकोते यांनाही शिवदारेंवर राजकीय सूड उगवायचा आहे. सिद्धेश्वर बँकेच्या निवडणूक निमित्ताने त्यांना संधी मिळाली. परंतु त्यांचा प्रभाव किती पडणार हे प्रत्यक्ष निवडणुकीतच दिसून येईल.

माजी आमदार चाकोते सिद्धेश्वर बँकेचे संचालक होते. पेट्रोलपंपासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. ते थकीत झाले. संचालकांनी स्वत: आणि नातेवाइकांना कर्जे द्यायची नाहीत, या नियमाचे उल्लंघन झाले. ही बाब बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सहकार खात्याने चाकोते यांचे संचालकपद रद्द केले. यामागे शिवदारेच आहेत, अशी भावना चाकोते यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी बाजार समितीच्या अविश्वास ठरावात अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला. आता बँक आणि सूत गिरणीच्या निवडणुकीत माने यांच्या मदतीने ते पुढे येतील.

विधानसभा निवडणुकीत शिवदारे दक्षिण सोलापूरमधून इच्छुक होते. काँग्रेसकडून तिकिटासाठी त्यांनी बैठक घेतली होती. तीत दिलीप माने यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करण्यात येतो. तिकीट मागण्याचा हक्क मलाही आहे. कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. पक्ष ज्यांना संधी देईल, त्यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले, असा खुलासा शिवदारे यांनी केला. पराभवानंतर श्री. माने यांनी बाजार समिती सभापती शिवदारेंवर अविश्वास ठराव दाखल केला. त्याला सामोरे जाता शिवदारेंनी राजीनामा दिला.

चाकोते का दुखावले... येथे पडली मूळ ठिणगी

- राजशेखर शिवदारे
- विश्वनाथ चाकोते
- दिलीप माने