आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रियेच्या तारखा एकच, २२ मे रोजी मतदान, २३ ला निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ब्रह्मदेव दादामाने आणि मनोरमा अर्बन या दोन्ही सहकारी बँकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. दोन्ही बँकांच्या निवडणूक प्रक्रियेतील तारखा एकच आहेत. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. २६ तारखेला दुपारी दाेनपर्यंत त्याची मुदत आहे. २२ मे रोजी मतदान आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांच्या मंजुरीने या दोन्ही बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड हे ब्रह्मदेवदादा माने बँकेचे तर डी. जी. मोरे हे मनोरमा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ब्रह्मदेवदादा माने बँक माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली चालते. निवृत्त जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोरमा बँकेची वाटचाल सुरू आहे. या दोघांनाही मानणारा सभासद वर्ग मोठा असल्याने बँकांच्या निवडणुका अविरोध होण्याची शक्यता आहे.

{ब्रह्मदेव दादा मानेबँक : जागा १५
{मनोरमाअर्बनबँक : जागा १७
{उमेदवारीअर्जांचीमुदत : २६ एप्रिल
{आलेल्याअर्जांचीछाननी : २७ एप्रिल
{वैधउमेदवारांचीयादी प्रसिद्ध : २८ एप्रिल
{माघारीघेण्याचीशेवटची मुदत : १२ मे
{उमेदवारांनाचिन्हवाटपाची तारीख : १३ मे
{मतदानाचीतारीख: २२ मे, स. ते दु.
{मतमोजणीनिकाल: २३ मे : स. ११ वाजता
माने, मनोरमा बँकेच्या निवडणुका